जेएनएन, बीड. Santosh Deshmukh Murder Case: बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी हत्या झाली होती. या प्रकरणात आता पर्यंत 8 ते 9 जणांना अटक करण्यात आली आहे. यातील एक आरोपी सुदर्शन घुले यांची कोठडी संपत असल्यानं त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी न्यायालयानं त्याची कोठडी वाढवली आहे.
पोलिसांनी आणखी एक मोबाईल सापडला
या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी रिमांड रिपोर्ट मध्ये डाटा रिकव्हर केला असून त्यावर तपास सुरु आहे. या तपासादरम्यान पोलिसांनी आणखी एक मोबाईल हस्तगत केला आहे, अशी माहिती सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी न्यायालयात दिली.
आरोपीच्या कोठडीत वाढ
पोलिसांना सापडलेल्या मोबाईलचे लॉक उघडायचा आहे असं म्हणत सरकारी वकिलांनी आरोपीच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. तसंच, 4 जानेवारीला अटक झाली आणि मकोका 10 जानेवारी रोजी लागला. त्यामुळे पुढील तपास करायचा आहे, अशी मागणी सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी केली. यानंतर न्यायालयानं आरोपीच्या कोठडीत 5 दिवसांची वाढ केली आहे.
हेही वाचा - 'आम्ही काहीही करू शकत नाही', SC ने फेटाळली हुंडा आणि घरगुती हिंसा कायद्यात सुधारणा मागणीची याचिका
आरोपींच्या वकीलांचा आरोप
सरपंच Santosh Deshmukh हत्या प्रकरणातील आरोपींचे वकील अनंत तिडके यांनी सुनावणीनंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी तपासी यंत्रणा जाणीवपूर्वक या प्रकरणाचे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रकरण कायम चर्चेत राहण्यासाठी हे सर्व करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
हेही वाचा - जीबीएस आजाराच्या महाराष्ट्रात पहिला बळी, पुण्यात मोफत उपचार, आरोग्यमंत्री म्हणाले, चिंता करु नका…
18 तारखेला आरोपीला न्यायालयीन कोठडी झाली होती. आज आरोपी सुदर्शन घुलेची दहा दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली होती. जे मोबाईल्स सुदर्शन घुले कडून हस्तगत करण्यात आले त्याचे पासवर्ड काढायचे आहेत. त्याबरोबरच जे डिजिटल एव्हिडन्स मिळाले आहेत, त्याबद्दल विचारणा करायची आहे, असं वकिलांनी न्यायालयात सांगितलं. मात्र, तपासी यंत्रणा जाणीवपूर्वक या प्रकरणाचे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रकरण कायम चर्चेत राहण्यासाठी हे सर्व करत आहे, असा आरोप आरोपींचे वकील अनंत तिडके यांनी केला.