जेएनएन, पुणे. Pune GBS Cases: पुण्यासह आसपासच्या परिसरात जीबीएस आजाराच्या प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे. गुइलेन-बॅरे सिंड्रोमने ग्रस्त असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या वतीने पालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात 45 खाटांचा विशेष वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे.

रुग्णालयात मोफत उपचार

पालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात स्थापन करण्यात आलेल्या या विशेष वॉर्ड मध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व रुग्णांवर या रुग्णालयात मोफत उपचार केले जातील, अशी माहिती समोर आली आहे.

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले

दरम्यान, पुण्यात जीबीएस आजाराच्या वाढत्या घटनांबद्दल महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जीबीएस हा संसर्गजन्य आजार नाही, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

हेही वाचा - पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) चे 101 संशयित रुग्ण, जाणून घ्या काय आहे हा आजार आणि त्यापासून कसा बचाव करू शकता!

    जीबीएस हा संसर्गजन्य आजार नाही

    जीबीएस हा संसर्गजन्य आजार नाही. हा आजार एखाद्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असताना होतो. रुग्णांच्या संख्येत वाढ रोखणे ही आमची पहिली प्राथमिकता आहे, असं आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

    सोलापुरात एका संशयिताचा मृत्यू

    दुर्मिळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर गिलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) च्या रुग्णांची संख्या रविवारी पुण्यात 100 च्यावर गेली आहे. यातच सोलापुरात जीबीएसमुळे एका संशयिताचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

    पुण्यात 73 जणांना GBS आजार

    विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या 101 संशयीत रुग्णांपैकी 16 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. यामध्ये 68 पुरुष आणि 33 महिला आहेत. 101 संशयीत रुग्णांपैकी 73 जणांना हा आजार झाल्याचे संपन्न झालं आहे. अशी माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे.

    9 वर्षांखालील सर्वाधिक रुग्ण

    राज्य आरोग्य विभागाने केलेल्या विश्लेषणात असे दिसून येते की 101 रुग्णांपैकी 19 रुग्ण 9 वर्षांखालील आहेत, 15 रुग्ण 10-19 वयोगटातील आहेत, 20 रुग्ण 20-29 वयोगटातील आहेत, 13 रुग्ण 30-39 वयोगटातील आहेत, 12 रुग्ण 40-49 वयोगटातील आहेत, 13 रुग्ण 50-59 वयोगटातील आहेत, 8 रुग्ण 60-69 वयोगटातील आहेत आणि एक रुग्ण 70-80 वयोगटातील आहे.