जेएनएन, मुंबई. Palghar Accident: पालघर जिल्ह्यात मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वऱ्हाडाच्या आयशर ट्रक आणि भरधाव कंटेनरची धडक झाली घडली. या अपघातात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला. मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची भीती आहे.
टेम्पो-कंटेनर ट्रकची भीषण धडक
पालघर जिल्ह्यात मुंबई-अहमदाबाद महामार्गावर टेम्पो-कंटेनर ट्रकची भीषण धडक झाली यात 11 ठार झाले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर 7 जखमी झाले आहेत, असे त्यांनी सांगितलं.
11 जणांचा मृत्यू
साखरपुड्यानंतर आनंदानं घरी चाललेल्या वऱ्हाडाच्या आयशर ट्रक आणि भरधाव कंटेनरची धडक झाली. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्यात ही घटना घडली. या अपघातात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती समोर येत आहे. ट्रकमध्ये 80-100 जण असल्याची भिती व्यक्त केली जात आहे.
जखमींवर उपचार सुरु
या अपघातात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. वीस ते पंचवीस जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
नेमका कसा घडला अपघात?
- पालघरच्या धानीवरी येथे वऱ्हाडाची ट्रक आणि कंटेनर मध्ये भीषण अपघात झाला आहे.
- बालाराम दांडेकर नावाच्या तरुणाचा साखरपुडा होता.
- साखरपुड्यासाठी वऱ्हाडी हे ट्रकमधून जात होते.
- धानीवरी इथं मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पोहोचले
- त्याचवेळी समोरून एक भरधाव कंटेनर येत होता.
- अचानक कंटेनरचा मागील डब्बा निसडला.
- तो डब्बा ट्रकवर येऊन आदळला.
- अन् कंटेनर धडकल्यामुळे वऱ्हाड घेऊन जाणारा ट्रक दूर फेकला गेला.
- ट्रकच्या मागील भाग पूर्णपणे वाकला.
