जेएनएन, पुणे. पुण्यात चालत्या कारमध्ये महिलेवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पुण्यातल्या प्रसिद्ध मुंढवा कोरेगाव पार्क परिसरातील एका हॉटेल मधून महिला आणि पुरुष बाहेर पडले होते. या महिलेची आणि पुरुषाची ओळख पार्टीमध्ये झाली होती, त्यानंतर घरी सोडण्याच्या बहाण्याने पुरुषांनी महिलेवर अत्याचार केला आहे. कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीसीटीव्हीची तपासणी सुरू

चालत्या कारमध्ये बलात्कार करून फरार होणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. पुणे पोलिसांकडून सीसीटीव्हीची तपासणी सुरू आहे. कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये सर्व वरिष्ठ अधिकारी दाखल झाले आहेत. प्रकरणाची सविस्तर चौकशी सुरु आहे. 

नेमकं काय आहे प्रकरण?

पुण्यातल्या कोरेगाव पार्क परिसरातील एका प्रसिद्ध हॉटेल मधून महिला आणि पुरुष बाहेर पडले होते. या महिलेची आणि पुरुषाची ओळख पार्टीमध्ये झाली होती, असे समोर आले आहे. पुरूषाने त्यानंतर घरी सोडण्याच्या बाहण्याने महिलेवर बलात्कार केल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.

शहरात तीव्र संताप 

    या घटनेमुळे शहरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. तर काही दिवसांपूर्वीच पुण्यातील भोर जिल्ह्यातील नसरापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचार करून हत्या केल्याची घटना ताजी असतानाच कोरेगाव पार्कमध्ये घडलेल्या या महिलेवरील अत्याचाराच्या घटनेमुळे संताप व्यक्त होत आहे.