जेएनएन, मुंबई. Maharashtra Weather Update News: राज्यात मागील तीन-चार दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. राज्यात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली जात आहे. आजही अनेक भागात मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट झाली आहे. यातच आता हवामान विभागानं ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केला आहे.
गारपीट होण्याची शक्यता
आयएमडीच्या अंदाजानुसार, पुढील 4-5 दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचे वारे आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात वादळ किंवा गारपीट होण्याची शक्यता आहे.
आज या जिल्ह्यांना येलो- अलर्ट
आज राज्यातील मुंबई, रत्नागिरी, रायगड, सिंद्धुदुर्ग, ठाणे, पालघर, नाशिक, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, नांदेड, परभणी, अमरावती, वर्धा, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांनी येलो अलर्ट देणात आला आहे. तर अहिल्यानगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, बीड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
2 April, आयएमडीच्या अंदाजानुसार, पुढील ४-५ दिवस🟡 राज्यात विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचे वारे आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) April 2, 2025
ऑरेंज 🟠अलर्टसह दर्शविलेल्या काही ठिकाणी, वादळ किंवा गारपीट होण्याची शक्यता आहे.
कृपया काळजी घ्या.@RMC_Mumbai @imdnagpur pic.twitter.com/gu4bNUznjw
उद्या (3 एप्रिल) या जिल्ह्यांना अलर्ट
उद्या राज्यातील रायगड, सिंद्धुदुर्ग, ठाणे, पालघर, अहिल्यानगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, बीड, लातूर, उस्मानाबाद, नाशिक, जळगाव, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नांदेड, परभणी, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांनी येलो अलर्ट देणात आला आहे. तर अमरावती, अकोला आणि गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हेही वाचा - Mahabaleshwar Tourism Festival: पर्यटकांसाठी पर्वणी, महाबळेश्वर इथं भव्य तीन दिवसीय पर्यटन महोत्सव
हवामान विभागानं केलं आवाहन
राज्यात वादळी वाऱ्यासह गारपिट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळे पावसादरम्यान, वीजाही कडकडाडू शकता, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, तसंच, वाऱ्यामुळे शेती पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, असं आवाहन हवामान विभागानं केलं आहे.