जेएनएन, मुंबई.Today Maharashtra Weather Update: राज्यभरात उन्हाच्या तीव्रता वाढत असतानाच नागरिकांना वादळी वाऱ्यासह पावसाचा अनुभव देखील येणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील काही दिवस राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये वादळी वारे, विजांचा कळकडाटांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार कोकण पासूनभागात पुढील पाच दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात आज काही ठिकाणी तर तीन ते पाच एप्रिल दरम्यान तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
विदर्भात आज काही ठिकाणी तर तीन व चार एप्रिल रोजी बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आज दिनांक 2 एप्रिल रोजी नाशिक व नाशिक जिल्ह्याचा घाट विभाग अहिल्यानगर पुणे व पुणे जिल्ह्याचा घाट विभाग सातारा व सातारा जिल्ह्याचा घाट विभाग व छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अमरावती, चंद्रपूर येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाटासह ताशी 50 ते 60 किलोमीटर वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याने, वरील सर्व जिल्ह्यांना आज दोन एप्रिल रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.
आज दिनांक 2 एप्रिल रोजी कोकणातील बहुतांश जिल्ह्यात मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर वादळी वाऱ्याचं हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे दिनांक 1 एप्रिल रोजी धुळे, नंदुरबार, कोल्हापूर व कोल्हापूर जिल्ह्याचा घाट विभाग सातारा व सातारा जिल्ह्याचा घाट विभाग सांगली, बीड, धाराशिव, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ येथे दिनांक 2 एप्रिल रोजी धुळे, नंदुरबार, जळगाव, कोल्हापूर व कोल्हापूर जिल्ह्याचा घाट विभाग सांगली, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ येथे पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणून येथे वरील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
पुणे व पुणे व परिसरात आज पासून तीन दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहून अनेक भागात मेघ गर्जना विजांचा कडकडाट व ताशी 30-40 प्रति वेगाने वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणून पुणे येथे पुढील तीन दिवस येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.