जेएनएन, मुंबई. Nepal Violence: नेपाळमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील नागरिकांसाठी महाराष्ट्र राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामार्फत महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नेपाळमध्ये 100 पेक्षा अधिक लोक अडकले

नेपाळमध्ये महाराष्ट्रातील 100 पेक्षा अधिक लोक अडकले आहेत. आम्ही त्यांच्या संपर्कात आहे. अडकलेल्या महाराष्ट्रातील आमच्या सर्व लोकांच्या सुरक्षेसाठी, आम्ही दूतावासाच्या संपर्कात आहोत, अशी माहिती गृह राज्य मंत्री योगेश कदम यांनी दिली आहे. 

 हेल्पलाइन क्रमांक जारी

सध्या नेपाळमध्ये प्रवास टाळावा. जे नागरिक सध्या नेपाळमध्ये आहेत त्यांनी आपल्या निवासस्थानीच सुरक्षित राहावे. अनावश्यकपणे बाहेर पडू नये व स्थानिक प्रशासनाच्या तसेच भारताच्या दूतावासाच्या सूचनांचे पालन करावे. कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी दूतावासाच्या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधावाः

 +977-980 860 2881 (व्हॉट्सअ‍ॅप कॉलसाठीही उपलब्ध)

    +977-981 032 6134 (व्हॉट्सअ‍ॅप कॉलसाठीही उपलब्ध) 

    राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, महाराष्ट्र, नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत आहे. कृपया अधिकृत माध्यमांद्वारेच माहिती प्राप्त करावी व अफवांपासून दूर राहावे, असे आवाहनही राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामार्फत करण्यात आले आहे. 

    राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, महाराष्ट्र (91- 9321587143 व्हॉट्सअ‍ॅप कॉलसाठीही उपलब्ध 91- 8657112333 व्हॉट्सअ‍ॅप कॉलसाठीही उपलब्ध )