जेएनएन, मुंबई. केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेच्या थर्तीवर महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी सन्मान योजना सुरु केलेली आहे. या योजने अंतर्गत वर्षाला 6000 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना वर्षाला एकूण 12000 रुपये अनुदान मिळत आहे. या शेतकरी सन्मान योजनेचा सातवा हप्ता वितरीत होणार आहे.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता वितरित करण्याचा कार्यक्रम आज मुंबईत मंत्रालयात होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित राहणार आहेत. 

नमो शेतकरी महा सम्मान निधी योजना 

जर का तुम्ही प्रधान मंत्री पीएम किसान सम्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल तर आता नमो शेतकरी महा सम्मान निधी योजना महाराष्ट्र शासनाद्वारे सुरु करण्यात आली आहे यात योजनेत सुद्धा तुम्हाला वार्षिक एकूण 6000 रुपये अनुदान मिळतील.

शेतकऱ्यांना 12000 रुपये मिळतात

प्रधान मंत्री सम्मान निधी योजना हि केंद्र शासनाच्या माध्यमातून चालवली जात आहे, आता महाराष्ट्र शासनाद्वारे हि नमो शेतकरी योजना राबवण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत सुद्धा वार्षिक 6000 रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत. केंद्र शासनाद्वारे 6000 रुपये तसेच राज्य शासनाद्वारे 6000 एकूण 12000 रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार आहे.

    नमो शेतकरी योजना लाभार्थी स्टेटस लिस्ट

    • Namo Shetkari Yojana Status List बघण्यासाठी तुम्हाला दोन पर्याय दिले आहे 
    • 1) मोबाइल नंबर 2) रेजिस्ट्रेशन नंबर यातील कोणताही एक पर्याय निवडा उदाहरणासाठी आम्ही रेजिस्ट्रेशन नंबर हा पर्याय निवडला आहे. 
    • त्यानंतर Captcha कोड भरून Get Data बटन वर क्लिक करा. 

    namo shetkari yojana status

    • शेवटी तुमच्या स्क्रीनवर शेतकऱ्याची सर्व माहिती आणि Fund Disbursed Details येईल यार तुम्हाला आता पर्यंत प्राप्त झालेल्या Installment ची माहिती मिळेल.

    हेही वाचा - Mumbai High Tide: वादळी वारा-पावसाचा फटका; सर्वच बंदरांना धोक्याचा इशारा, सागरी प्रवासी वाहतूक ठप्प