जेएनएन, मुंबई: वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील सर्वच बंदरांना धोका असल्याचा इशारा देणारा तीन नंबरचा ‘बाबटा’ (धोक्याचा झेंडा) फडकवण्यात आला आहे. परिणामी गेटवे–एलिफंटा, गेटवे–जेएनपीटी, मोरा–भाऊचा धक्का, करंजा–रेवास या मार्गांवरील सागरी प्रवासी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
जलवाहतूक तब्बल सात वेळा बंद
गेल्या दोन महिन्यांत या मार्गावरील जलवाहतूक तब्बल सात वेळा बंद करावी लागली आहे. त्यामुळे हजारो प्रवासी, विशेषत: नोकरीनिमित्ताने ये-जा करणारे कर्मचारी तसेच पर्यटनासाठी येणारे पर्यटक यांना मोठा फटका बसला आहे.
सततच्या हवामानातील बदलामुळे सागरी वाहतूक कोलमडत आहे. यामुळे स्थानिक अर्थकारणावरही परिणाम होत असल्याचे चित्र आहे. बंदर प्रशासनाकडून सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.यामुळे प्रवाशांचे मोठे नुकसान होत आहे.
बंदरावर अलर्ट!
- रायगड जिल्ह्यात सर्व बंदरांवर तीन नंबरचा बाबटा फडकवला.
- गेटवे–एलिफंटा, जेएनपीटी, मोरा–भाऊचा धक्का, करंजा–रेवास मार्गावरील सेवा बंद.
- गेल्या दोन महिन्यांत सातव्यांदा सागरी वाहतूक ठप्प.
- हजारो प्रवाशांना, नोकरी करणाऱ्यांना आणि पर्यटकांना मोठा फटका बसला आहे.
हेही वाचा - Nashik Accident News: नाशकात भीषण अपघात, बस आणि मोटारसायकलच्या धडकेत तिघांचा मृत्यू
मुंबई शहर व उपनगरात आकाश साधारणतः ढगाळ राहून मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
- भरती - दुपारी 12:10 वाजता - 4.57 मीटर
- ओहोटी - सायंकाळी 6:20 वाजता - 0.69 मीटर
- भरती - मध्यरात्री 00:35 वाजता (उद्या, 9 सप्टेंबर 2025) - 4.45 मीटर
- ओहोटी - सकाळी 6:18 वाजता (उद्या, 9 सप्टेंबर 2025) - 0.62 मीटर
🗓️ ८ सप्टेंबर २०२५
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) September 8, 2025
⛈️ ☔ मुंबई शहर व उपनगरात आकाश साधारणतः ढगाळ राहून मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
🌊 भरती -
दुपारी १२:१० वाजता - ४.५७ मीटर
ओहोटी -
सायंकाळी ६:२० वाजता - ०.६९ मीटर
🌊 भरती -
मध्यरात्री ००:३५ वाजता (उद्या, ९ सप्टेंबर २०२५) - ४.४५ मीटर…
हेही वाचा - धक्कादायक! रात्री चिकन खाल्लं अन् विषबाधा होऊन अल्पवयीन मुलीचा मृत्यू, कुटुंबातील 4 जण आजारी