जेएनएन, मुंबई. Mumbai Weather Forecast: मुंबई आणि उपनगरांमध्ये आज उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. तर दुपारी/संध्याकाळ हलक्या पावसाची किंवा गडगडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. IMD Mumbai ने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.

मुंबईत दिवसा उकाडा

मुंबई शहर आणि उपनगरात आज आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 35 अंश सेल्सिअस आणि 29 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. तापमान 35 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता असल्यामुळे मुंबईकरांना दिवसा उकाडा सहन करावा लागू शकतो.

रात्री हलक्या ते मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

IMD Mumbai ने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबई शहरात आणि उपनगरांमध्ये आकाश अंशतः ढगाळ राहिल . उष्ण आणि दमट हवामानाची दाट शक्यता आहे. शहर आणि उपनगरांमध्ये रात्री किंवा पहाटेच्या सुमारास हलक्या पावसाची शक्यता आहे.

राज्यातील हवामानाचा अंदाज (Maharashtra Weather Update)

    महाराष्ट्रातील काही अंतर्गत भाग, विशेषतः विदर्भ आणि खान्देशमध्येही उष्णतेचा जोर कायम राहू शकतो. हवामान विभागाने जून महिन्यात सरासरीपेक्षा अधिक उष्णतेच्या लाटांचा इशाराही दिला आहे. मराठवाडा, विदर्भात पुढील 24 ते 48 तासांत हवामानाचा रंग वारंवार बदलू शकतो. सकाळी कडक ऊन, दुपारी ढगांची गर्दी आणि संध्याकाळी मेघगर्जनेसह वादळी पावसाच्या सरी अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. काही ठिकाणी विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि स्थानिक स्वरूपाचा पाऊसही पडू शकतो.