जेएनएन, मुंबई. Mumbai Rains: भारतीय हवामान विभागाने बृहन्मुंबई क्षेत्रात आज (दिनांक 18 ऑगस्ट 2025) अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, सकाळपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी मुंबईतील दुसऱ्या सत्रातील अर्थात दुपारी 12 वाजेनंतर भरणाऱ्या सर्व शाळा, महाविद्यालयांना आज सोमवार, दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी सुटी जाहीर (Mumbai school holiday) केली आहे, अशी माहिती बीएमसीने दिली आहे.
नागरिकांनी घराबाहेर पडू नये
आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. काही आवश्यकता भासल्यास मदतीसाठी व अधिकृत माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या 1916 या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा, अशी विनंती करण्यात येत आहे.
📢 भारतीय हवामान विभागाने बृहन्मुंबई क्षेत्रात आज (दिनांक १८ ऑगस्ट २०२५) अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 🌧️⚠️
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) August 18, 2025
🏫 या पार्श्वभूमीवर, सकाळपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी…
अनेक भागात साचले पाणी
मुंबईत सोमवारी सलग तिसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस (Heavy Rains in Mumbai) सुरूच राहिला, ज्यामुळे काही सखल भागात पाणी साचले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. शहराच्या काही भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे दृश्यमानता कमी झाली आणि वाहनांची गती मंदावली, असे वाहनचालकांनी सांगितले.
आजही मुंबईत हवामान विभागाने पावसाचा रेड अलर्ट (Red alert in Mumbai) दिला आहे. मुसळधार पावसामुळे विविध भागातील रस्ते पाण्याखाली गेले. अंधेरी सबवे, लोखंडवाला कॉम्प्लेक्स सारख्या काही सखल भागात काही ठिकाणी पाणी साचले होते, ज्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला.
Mumbai, Maharashtra: Continuous heavy rainfall has caused water to enter the Andheri subway, due to which it has been shut pic.twitter.com/8jMqBdpXG1
— IANS (@ians_india) August 18, 2025
सविस्तर वाचा - Mumbai Rains: मुंबईकरांनो सावधान! पुढील 3 ते 4 तासांत…; घराबाहेर पडू नका - मुंबई पोलिसांचे आवाहन
राज्यातील या जिल्ह्यांत अलर्ट
रेड अलर्ट
- ठाणे, मुंबई, रायगड, रत्तागिरी, पुणे घाट, कोल्हापूर घाट, सातारा घाट,
ऑरेंज अलर्ट
- सिंधुदुर्ग, पालघर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, अमरावती,
येलो अलर्ट
- धुळे, नंदुरबार, नाशिक, नाशिक घाट, पुणे, अहिल्यानगर, सातारा, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, धाराशीव, अकोला, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ