जेएनएन, मुंबई. पाली हिल जलाशयामधील इनलेट आणि आऊटलेट व्हॉल्व्ह बदलण्याचे काम मुंबई महानगरपालिकेकडून  कडून आज करण्यात येणार आहे. त्यामुळे, बांद्रा आणि खार परिसरातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा खंडित (Mumbai Water Cut) राहणार आहे, अशी माहिती खासदार वर्षा गायकवाड यांनी X वर पोस्ट करुन दिली आहे.

पाणीपुरवठा खंडित होणारे भाग: 

BMC च्या माहितीनुसार, या कामाच्या कालावधीत खालील भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहील: 

हनुमान नगर, लक्ष्मी नगर, युनियन पार्क (रस्ता क्र. 1 ते 4), पाली हिल, चुईम गावाचा काही भाग, नरगिस दत्त मार्गाचे काही भाग, पद्मश्री देव आनंद मार्ग आणि पाली माळा रोड. 

कमी दाबाने पाणीपुरवठा होणारे भाग:

कांतवाडी, पाली नाका, पाली गावठाण, शेरली, राजन व माला गाव, खार दांडा कोळीवाडा, दांडपाडा, च्युईम गावठाण, गझधरबांध झोपडपट्टीचा काही भाग आणि खार (प.) मधील इतर काही भाग. 

    पाणी जपून वापरा

    यादरम्यान नागरिकांनी पाणी जपून व काळजीपूर्वक वापरावं असं आवाहन करते. माझी पालिका प्रशासनाला ही देखील विनंती आहे की, या कालावधीत लोकांना होणारा त्रास काही अंशी कमी करण्यासाठी पाणीपुरवठ्याचं अचूक नियोजन करावं.

    मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांचा आज सकाळी 6 वाजेपर्यंतचा अहवाल मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आला आहे. तो पुढील प्रमाणे…