एजन्सी, मुंबई: मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील गोरेगाव पूर्व भागातील एका इमारतीच्या 23 व्या मजल्यावरून उडी मारून एका किशोरवयीन मुलीने आत्महत्या केली आहे, असे मुंबई पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. ही घटना पहाटे ओबेरॉय स्क्वेअर कॉम्प्लेक्समध्ये घडली.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, अकरावीत शिकणाऱ्या 17 वर्षीय मुलीने इमारतीच्या सी विंगवरून उडी मारली. एका महिन्याच्या आत कॉम्प्लेक्समध्ये ही दुसरी घटना आहे. एका विद्यार्थ्याने ए विंगवरून उडी मारून आत्महत्या केली होती.

आरे कॉलनी पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि घटनेचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.