जेएनएन, मुंबई: मुसळधार पावसामुळे मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये जवळपास पूर्ण क्षमतेएवढा साठा झाला असून कोणतीही कपात करण्याची गरज नाही, असे स्पष्टीकरण बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)ने दिले आहे.

एकत्रित साठा तब्बल 98.82% 

बीएमसीच्या आकडेवारीनुसार, मंगळवार पर्यंत सातही तलावांमधील एकत्रित जलसाठा 14.30 लाख दशलक्ष लिटर (एमएल) म्हणजेच 98.82% इतका झाला आहे. गेल्या तीन वर्षांतील हा सर्वोच्च साठा असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

तीन तलाव ओसंडून वाहत आहे

मोदक सागर, तुळशी आणि विहार हे तलाव दुसऱ्यांदा पूर्ण क्षमतेने भरून ओसंडू लागले आहेत. तर उर्वरित तलाव तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा आणि भातसा हे देखील आता पूर्ण क्षमतेच्या अगदी जवळ पोहोचले आहेत.  

कपातीची गरज नाही

    बीएमसीच्या जलपुरवठा विभागाने स्पष्ट केले की, उपलब्ध साठा आगामी काही महिन्यांच्या पाणीपुरवठ्यासाठी पुरेसा आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणीपुरवठ्यात कपातीची चिंता करण्याचे कारण नाही.

    मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांचा आज सकाळी 6 वाजेपर्यंतचा अहवाल

    हेही वाचा - Mumbai MonoRail : मुंबईकरांसाठी मोठी बातमी.. मोनोरेल सेवा 20 सप्टेंबरपासून अनिश्चित काळासाठी होणार बंद, नेमकं कारण काय?