जेएनएन, मुंबई. Mumbai News: मुंबईत सणांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षाचे नवीन नियम लागू केले आहे. दहीहंडी व गणेशोत्सवाच्या काळात शहरात सुरक्षा व्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी एअरक्राफ्ट, एअर बलून उडवण्यावर बंदी घालण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
6 ऑगस्ट म्हणजेच आजपासून ते 4 सप्टेंबर या कालावधीत ड्रोन, रिमोट कंट्रोल उपकरणे, मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर्स, पॅरामोटर्स, हॅन्डग्लायडर्स, आणि हॉट एअर बलून यांच्या उड्डाणावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे.
बंदी घालण्याचा कारण!
मुंबईवर दहशतवादी किंवा देशविरोधी घटकांकडून हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेऊन ही बंदी घालण्यात आली आहे. या साधनांचा वापर करून हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळे शहरातील सुरक्षेसाठी ही बंदी घालण्यात आली आहे.
कोणाला मिळेल परवानगी?
फक्त पोलीस उपायुक्त (DCP) किंवा पोलीस उपायुक्त अभियान (DCP Operations) यांच्या लेखी परवानगीनेच अशा प्रकारची उपकरणं वापरण्याची परवानगी मिळणार आहे. इतर कोणी या उपकरणाचा वापर केल्यास संबंधितावर कडक कारवाई केली जाईल.
पोलिसांचे आवाहन!
मुंबई पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांनी या आदेशाचे पालन करावे. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी दिली आहे.