जेएनएन, मुंबई. राज्य सरकारने विदर्भ आणि मराठवाड्याच्या औद्योगिक व कृषी विकासाला चालना देणारा मोठा निर्णय घेतला आहे. वाढवण बंदर (Vadhavan Port) आणि समृद्धी महामार्ग यांना जोडणाऱ्या फ्रेट कॉरिडॉरला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

104 किलोमीटर लांबीचा महामार्ग भेंडवाड (ता. इगतपुरी, जि. नाशिक) येथे समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील अंतर्गत भागातील माल – विशेषतः औद्योगिक व शेती उत्पादन – थेट समुद्रमार्गाने (via port) देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात पोहोचवणं शक्य होणार आहे. 

प्रकल्पाचे फायदे!

  • विदर्भ व मराठवाड्यातील औद्योगिक व कृषी उत्पादनांना थेट समुद्रमार्ग मिळणार. 
  • मुंबई व परिसरातील रस्त्यांवरील वाहतूक कोंडी टळणार. 
  • लॉजिस्टिक्सचा वेळ व खर्च कमी होणार. 
  • आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळणार. 

प्रकल्पाकरिता हूडकोकडून घेणार 1 हजार 500 कोटी रुपयांचे कर्ज

या योजनेद्वारे मुंबई आणि आजूबाजूच्या गर्दीच्या रस्त्यांवरून मालवाहतूक हटवून एक स्वतंत्र मार्ग मिळणार आहे, ज्यामुळे वाहतूक सुरळीत होईल आणि वेळ ही वाचेल. प्रकल्पाकरिता हूडकोकडून 1 हजार 500 कोटी रुपयांचे कर्ज उभारण्यात येणार आहे.