जेएनएन, मुंबई: मुंबईतील नरीमन पॉईंट परिसरात फ्री प्रेस रोडजवळील समुद्रातून एका तरुणीचा मृतदेह आढळून आला. मृतदेह 24 वर्षीय मनिता गुप्ता यांचा असून, त्या यापूर्वी हरविल्याची नोंद झाली होती.

स्थानिकांनी पाण्यात एक मृतदेह तरंगताना पाहिल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. तत्काळ कफ परेड पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. 

आत्महत्या की अपघात?

प्राथमिक माहितीनुसार, मनिता गुप्ता यांचा मृत्यू कसा झाला हे अद्याप स्पष्ट झाला नाही. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून, आत्महत्या की अपघात याबाबत सर्व शक्यता तपासल्या जात आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अधिकृत चौकशी अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

घटने मागील गूढ वाढले 

मिळालेल्या माहितीनुसार, हा मृतदेह सध्या शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मनिता गुप्ता असं या 24 वर्षीय तरुणीचं नाव असून तरुणी बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. कफ परेड पोलीस ठाण्यात या बाबत बेपत्ता झाल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे या घटने मागील गूढ अधिक वाढले असून पोलीस तपासाअंती सत्य कळू शकणार आहे.