एजन्सी, मुंबई, Mumbai Double Murder Case: मुंबईत एका 40 वर्षीय पतीने त्याची पत्नी आणि मुलाची नायलॉन दोरीने गळा दाबून हत्या केली आहे. याप्रकरणात आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दिली आहे.

पत्नीचा खून पाहिला म्हणून मुलाची हत्या

आरोपी शिवशंकर दत्ताने आपल्या 36 वर्षीय पत्नीच्या निष्ठेवर संशय घेतल्याने हा गुन्हा केला. पत्नीची हत्या करताना पाहिल्यामुळे त्याने आपल्या मुलाचीही हत्या केल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

पोलिसांना दिली गळफास घेतल्याची माहिती

शिवकुमारने त्याची पत्नी पुष्पा दत्ता आणि तिच्या मुलाने मुंबईतील कांदिवली परिसरातील एका चाळीतील त्याच्या घरात गळफास घेतल्याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. (Mumbai Crime News)

पत्नीची व मुलाची हत्या केल्याचे केले कबूल

    "शिवशंकरने सांगितलेल्या घटनाक्रमात पोलिसांना तफावत आढळली. चौकशीदरम्यान त्याने विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून पत्नीची हत्या केल्याचे कबूल केले. त्याने आपल्या मुलाचीही अशाच पद्धतीने हत्या केली कारण त्याने आईची हत्या करताना वडिलांना पाहिले होते," असे अधिकाऱ्याने सांगितले.

    मृतदेह छताला लटकवले 

    शिवशंकरने पत्नी आणि मुलाने आत्महत्या केली आहे, असे दाखवण्यासाठी त्यांचे मृतदेह छताच्या स्टीलच्या रॉडला लटकवले होते.

    हत्येच्या आरोपाखाली अटक

    गुन्हा कबूल केल्यानंतर आणि अधिक तपास केल्यानंतर पोलिसांनी शिवशंकरला हत्येच्या आरोपाखाली अटक केली, असे अधिकाऱ्याने सांगितले.