जेएनएन, मुंबई. Maharashtra Cabinet Meeting: राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा म्हणजेच अटलसेतूवरुन प्रवास करणाऱ्या वाहनांच्या पथकराबाबत मोठा निर्णय घेण्यात (atal setu toll price 2025) आला आहे.
अटलसेतूवरील पथकर जैसे-थे
अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटलसेतूसाठी आणखी एक वर्षासाठी 250 रुपये इतकाच कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. Atal Setu वर एका प्रवासासाठी 250 आणि परतीच्या प्रवासासाठी 375 रुपये इतका टोल आकारला जातो.
समुद्रावरील भारतातील सर्वात लांब पूल
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) म्हणजेच अटल सेतू समुद्रावर उभारण्यात आलेला भारतातील सर्वात लांब पूल आहे. यापुलामुळे मुंबई ते नवी मुंबईतील अंतर कमी झालं आहे. तब्बल सात वर्षं या पूलाचं काम सुरु होतं. या पुलाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते जानेवारी 2024 मध्ये उद्घाटन करण्यात आलं होते. या पुलामुळे मुंबई ते नवी मुंबई अंतर दोन तासांवरुन 20 मिनिटांवर आलं आहे.
हेही वाचा - पुण्यात थैमान घातलेल्या नव्या GBS व्हायरसचे कोल्हापूरमध्ये आढळले दोन रुग्ण, आरोग्य यंत्रणा अलर्ट
अटल सेतूविषयी माहिती
हा पूल 21.8 किमी लांबीचा आहे. पुलाचा 16.5 किलोमीटर भाग पाण्यावर उभारण्यात आला आहे. तर 5.5 किलोमीटर भाग जमिनीवर आहे. अटल सेतुवर सहा मार्गिका आहेत. हा पूल उभारण्यासाठी 17 हजार 840 कोटी रुपये खर्च आला. त्यासाठी 1 लाख 77 हजार 903 मेट्रिक टन स्टील आणि 5 लाख 4 हजार 253 मेट्रिक टन सिमेंट वापरण्यात आलं. हा पूल 100 वर्ष टिकेल असा कंपनीचा दावा आहे. कार, टॅक्सी, कमी वजनाची वाहनं, मिनी बस, टू एक्सल बस, लहान ट्रक याच वाहनांना पुलावरुन प्रवास करण्याची परवानगी आहे.