जेएनएन, पुणे. GBS Cases in Kolhapur: पुण्यामध्ये थैमान घातलेल्या जीबीसी या आजाराचे दोन रुग्ण कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे शासकीय रुग्णालय म्हणजेच सीपीआरमध्ये दाखल आहेत, अशी माहिती आहे.

कोल्हापुरात दोन रुग्ण

कोगनोळी कर्नाटक येथील 60 वर्षाचे वृद्ध व हुपरी (ता. हातकणंगले) येथील 6 वर्षांचे बाळ दोन दिवसांपासून उपचार घेत (Kolhapur GBS Cases) असून या आजाराचे सीपीआरमध्ये महिन्याकाठी 6 ते 7 रुग्ण दाखल होऊन ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. पुण्यामध्ये आतापर्यंत 120 हून अधिक संशयित रुग्ण आढळून आले आहेत. हा एक दुर्मीळ आजार असून हा आजार संसर्गजन्य नाही. 

जीबीएस आजाराची लक्षणे

प्राथमिक लक्षणांमध्ये तापायांना मुंग्या येणे, अशक्तपणा, बोलण्यास व गिळण्यास त्रास होणे ही असून या आजाराचे पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडल्याने याचा अभ्यास शासनाच्या समितीच्यावतीने सुरू आहे. 

जीबीएस आजारावर उपाय

    या आजारापासून बचावासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे हेच गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

    जीबीएस हा संसर्गजन्य आजार नाही

    जीबीएस हा संसर्गजन्य आजार नाही. हा आजार एखाद्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असताना होतो. रुग्णांच्या संख्येत वाढ रोखणे ही आमची पहिली प्राथमिकता आहे, असं आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

    सोलापुरात एकाचा मृत्यू 

    दुर्मिळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर गिलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) च्या रुग्णांची संख्या रविवारी पुण्यात 100 च्यावर गेली आहे. यातच सोलापुरात जीबीएसमुळे एका संशयिताचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.