जेएनएन, मुंबई: गेट वे ऑफ इंडियासमोर एक मोठी घटना घडली आहे. गेट वे ऑफ इंडियासमोर वेरावल येथील बोट समुद्रात बुडाली, असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे.
बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
बुडालेल्या बोटीवरील प्रवासी व कर्मचारी मोरा येथे पोहोचल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच तत्काळ कोस्ट गार्ड, नौदल, पोर्ट ट्रस्ट आणि पोलीस दल बचाव कार्यासाठी दाखल झाले.
समुद्रात शोध व बचाव मोहीम सुरू असून, बोटीवरील सर्वांच्या सुरक्षिततेबाबत माहिती गोळा केली जात आहे.
नौकाधारकांना सतर्कतेचा इशारा
बोट दुर्घटनावर संबंधित यंत्रणा बारकाईने लक्ष ठेवून आहे. या अपघातामुळे समुद्र किनाऱ्याजवळील मच्छीमार आणि खासगी नौकाधारकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अपघाताच्या पार्श्वभूमीवर किनाऱ्याजवळ सुरक्षा तपासणी अधिक कडक करण्यात आली आहे. दुर्घटनेत मृत्यूचा आकडा अजूनही समोर आला नाही.