जेएनएन, कराड: कोयना धरणाच्या (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी प्रशासनाने आज 21 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 3 वाजता मोठा निर्णय घेतला आहे.
निर्णयानुसार, कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 9 फुटांवरून 7 फुटांपर्यंत खाली आणले जाणार आहे. यामधून तब्बल 54,000 क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.
नागरिकाला सतर्कतेचा इशारा!
कोयना धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले जाणार असल्यामुळे कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कराड, पाटण, चिपळून तसेच कोयना नदीलगतच्या इतर गावांमधील नागरिकांना प्रशासनाने खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
नदीकाठच्या खेड्यांमध्ये पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी व नागरिकांनी नदीपात्राजवळ जाणे टाळावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.सुरक्षाच्या दृष्टीने स्थानिक प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन पथके सतर्क करण्यात आले आहे.