जेएनएन, मुंबई. Maharashtra Weather Update: मुंबईसह महाराष्ट्राला काल मुसळधार पावसाने झोडपले आहे. आजही राज्यात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आज मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

आज कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेशात मुसळधार पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यात पावसानं जोर पकडला आहे. अनेक भागात पावसानं धुमाकूळ घातला आहे. राज्यात वाऱ्यांचा वेग 40 ते 50 किलोमीटर प्रती तास असणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दक्षिण कोकणात पावसाचा जोर वाढला असून आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. आज मुंबई शहरात दिवसभर ढगाळ वातावरण असून जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

अरबी समुद्रामध्ये चक्रीय वादळ निर्माण झाले असून त्याचा परिणाम राज्यात दिसत आहे. या दरम्यान पावसाशिवाय मेघगर्जना आणि वाढत्या वाऱ्यांचा वेग अनुभवाला येणार आहे.  अनेक जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज आणि येलो अलर्ट देण्यात आला आहे. 

राज्यात पावसाचा अलर्ट

    IMD च्या माहितीनुसार

    30 मे पासून पाऊस कमी होण्याची शक्यता

    मध्य महाराष्ट्रात (पुण्यातही) व मराठवाड्यात पावसात कपात आजपासून संभवते. 30 मे पासून पुढील 6-7 दिवस राज्यात पावसात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे, कारण अरबी समुद्रातून येणाऱ्या पश्चिम वाऱ्यांची ताकद कमी होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आर्द्रतेचा प्रवेशही कमी होईल, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे माजी प्रमुख हवामान अंदाज आणि पीक सल्लागार अनुपम कश्यपी यांनी दिली आहे.

    अलर्टचा प्रकारजिल्ह्यांची नावे
    ऑरेंजरत्नागिरी, सिंद्धुदुर्ग, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया.
    येलोरायगड, जळगाव, पुणे घाट, कोल्हापूर घाट, सातारा घाट, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, अकोला, बुलढाणा, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ.