जेएनएन, मुंबई. Maharashtra Farmers Loan Waiver: राज्यातील शेतकरीला महायुतीच सरकार स्थापन झाल्यास पूर्ण कर्जमाफी केली जाईल असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकरीला कर्जमाफी शक्य नाही असे भाष्य केल्यानंतर शेतकरी अधिकच आक्रमक झाले आहे.
शेतकरी कर्जमाफीसाठी आक्रमक
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्यास सत्ताधारी नेत्यांना गावबंदी करणार असा इशारा मनोज जरांगे पाटील यांना सरकारला दिला आहे.
हेही वाचा - Maharashtra Weather Update: राज्यात आजपासून पुढील 4 दिवस मुसळधार पाऊस, वादळ आणि गारपीट; अलर्ट जारी
गावबंदी करण्याच्या इशारा
कर्जमाफीच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना तंबी दिली आहे. तर जलसंधारणमंत्री गिरीष महाजन यांनी कर्जमाफी दिल्यास तिजोरीत रिकामी होईल असल्याचे भाष्य केले आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्यास सत्ताधारी नेत्यांना गावबंदी करणार असा इशारा मनोज जरांगे पाटील यांना सरकारला दिला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन मनोज जरांगे पाटलांनी अधिकच आक्रमक झाले आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी न केल्यास सत्ताधारी नेत्यांना गावबंदी करणार असा इशाराच आता जरांगे पाटलांनी दिला आहे.
कर्जमाफीसाठी शेतकरी आंदोलन करणार
शेतकरीला कर्जमाफीचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. त्यावर अजित पवार यांनी आणि सरकारने घुमजाव केल्यानंतर शेतकरी आक्रमक झाले आहे. अजित पवार यांनी शेतकरीला कर्जमाफी शक्य नाही या वक्तव्याचा निषेध शेतकरीकडून केले जात आहे. अजित पवार यांच्या घरसमोर काही शेतकरी आंदोलन करणार असल्याची माहिती देखील आहे. शेतकरीच्या या आंदोलनला मनोज जरांगे पाटील यांनी पाठिंबा दिला असून सत्ताधारी नेत्याला गावबंधी करण्याचा इशारा दिला आहे.