जेएनएन, मुंबई. Maharashtra Weather Update Today: राज्यात आजपासून मुसळधार पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात आज मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. उद्यापासून मराठवाडा भागात पाऊस सुरु होईल, असा ही अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मुंबईत येलो अलर्ट (Yellow Alert in Mumbai)

मुंबईत गुरुवारी काही भागात पाऊस झाला आहे. मुंबईत आज जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर राज्यात वाऱ्यांचा वेग 40 ते 50 किलोमीटर प्रती तास असणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मात्र संपूर्ण महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना रेड अलर्ट

कोकणात पावसाचा जोर वाढला असून आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. कोकणात मुसळधार पावसाचा अलर्ट हा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तर कोकणातील रत्नागिरी आणि रायगड या दोन जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. 

अरबी समुद्रामध्ये चक्रीय वादळ निर्माण झाले असून त्याचा परिणाम कोकमावर दिसत आहे. या दरम्यान पावसाशिवाय मेघगर्जना आणि वाढत्या वाऱ्यांचा वेग अनुभवाला येणार आहे.

    राज्यात हवामान विभागाने दिलेला अलर्ट

    • कोकण विभागातील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, सिंद्धुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 
    • तर उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांना येलो अलर्ट तर नाशिक,  मध्य महाराष्ट्रात अहिल्यानगरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 
    • पश्चिम महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. 
    • मराठवाड्यात जालना, परभणी, बीड, हिंगोली, धाराशीव जिल्ह्यांना येलो अलर्ट तर छत्रपती संभाजीनगरला जिल्ह्याला मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 
    • विदर्भात अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.  

     हेही वाचा -Mumbai News: मुंबईत 249 दरड प्रवण ठिकाणे, मुख्यमंत्र्यांनी दिले मॉकड्रिल घेण्याचे निर्देश