जेएनएन, मुंबई. Mumbai Latest News: राज्यातील दरड प्रवण क्षेत्राचे नव्याने मॅपिंग करणे गरजेचे आहे. गेल्या काही वर्षांमध्ये घडलेल्या घटनांचा विचार करता मॅपिंगमध्ये नसलेल्या ठिकाणीही दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. दरड कोसळण्याच्या जागी तातडीने सुरक्षा उपाययोजना कराव्यात. यात जिल्हाधिकारी यांनी प्रामुख्याने लक्ष घालावे. मुंबईत दरड प्रवण अशी एकूण 249 ठिकाणे आहेत. याबाबत सर्वच संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना कराव्यात. आपत्तीकाळात बचावकार्यासाठी पुरवण्यात आलेल्या साहित्याचे मॉकड्रिल घ्यावे, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
मंत्रालयातील परिषद सभागृहात मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
ज्या ठिकाणी दरड कोसळणे किंवा पूर यामुळे संपर्क तुटतो अशा ठिकाणी रेशनचा अधिकचा साठा पुरवण्यात यावा. तसेच अशा भागातील गर्भवती महिलांना आपत्ती पुर्वीच सुरक्षित स्थळी अथवा रुग्णालयांमध्ये हलवण्यात यावे. जेणेकरून कोणताही अवनस्थ प्रसंग उद्भवणार नाही.
विद्युत विभागाने त्यांची सर्व यंत्रणा सुस्थितीत असल्याचे तपासून घ्यावे, राज्यातील आपत्ती प्रवण भागांचे अद्ययावत नकाशे हवाई दलास द्यावेत, महानगरपालिकेने रस्त्यांची कामे करताना लावलेले आडथळे पावसाळ्यापूर्वी काढून टाकावेत, पश्चिम द्रृतगती मार्गावर ज्याठिकाणी पाणी साठते तेथे दक्षता घेण्यात यावी. धोकादायक इमारतीमधील रहिवाशांचे स्थलांतर करावे अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.