जेएनएन, मुंबई. Maharashtra Weather Update News: राज्यात आज अनेक भागात तुफान पाऊस झाला आहे. अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीटही झाली आहे. तर कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणत पावसानं शेती पिकांचे नुकसान केलं आहे. सध्याही अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. 24 जिल्ह्यात पाऊस झालेला आहे, 25 ते 30 हजार हेक्टरवर नुकसान झाले आहे. पंचनामे झाल्यावर सरकाराच्या पातळीवर मदत करू अशी घोषणा कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली आहे.
भिवंडी भागात अवकाळी पावसाची हजेरी
भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागात अवकाळी पाऊस झाला आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली होती. पडघा, वडपे, दाभाड, लोनाड परिसरात धुळीचे वादळ आले होते. जोरदार वारा सुरू झाल्यानंतर या भागात पावसाला सुरुवात झाली.
शहापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट
सध्या उकाड्याने हैराण झाले असून, उन्हाचा तडाखा वाढला आहे. यातच दुपारनंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह पाऊस पडत असून, तालुक्यातील काही भागात गारपीट देखील झाली आहे. गारपीट झालेल्या भागात लहान मुले थंडगार गारा वेचण्यात मग्न झाल्याचे दिसून येत आहे.
ठाकुर्ली, अंबरनाथमध्ये ढगाळ वातावरणासह वादळी वारा वाहत आहे. मुंबईतही अनेक वादळ पाहायला मिळले आहे.
डोंबिवली मधे वादळी वारे...@RMC_Mumbai @Hosalikar_KS @KDMCOfficial #डोंबिवली #Dombivli #MumbaiWeather pic.twitter.com/TrNwh8X2yJ
— अभिजीत🚩🇮🇳 #ModiKaParivar (@Abhikapshikar) April 4, 2025
हेही वाचा - Pune News: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील त्या घटनेची चौकशी होणार, मुख्यमंत्र्यांनी केली समिती गठीत
अवकाळी पावसाने व गारपिटीने शेतीपिकांचे मोठे नुकसान
अवकाळी पावसाने व गारपिटीने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वैजापूर तालुक्यातील करंजगाव येथील राजू जगन्नाथ मगर यांची करंजगाव शिवार गट 67 मध्ये 1 हेक्टर 18 आर शेती आहे. या शेतात 2.5 एकर मध्ये कांदे लावले होते. काढणीला आलेल्या 2.5 एकरातील संपूर्ण कांदा पिकाचे नुकसान झालेले आहे. आपण अगोदरच कर्जबारी असून, शासनाकडून आता मदत मिळाली नाही तर, कर्ज कसे भरणार असा प्रश्न उपस्थित करत आहेत. शासनाकडून मदत मिळाली नाही तर, आत्महत्या हाच आमच्यासमोर पर्याय उरला आहे. अशी प्रतिक्रिया कांदा उत्पादक शेतकरी राजु जगन्नाथ मगर यांनी दिली आहे.
हेही वाचा - Farmer Suicide in Amaravati: हा अकडा वाचून तुम्हाला धक्का बसेल! अमरावती विभागात 21,000 शेतकऱ्यांची आत्महत्या
पंचनामे सुरू
राज्यात अवकाळी पाऊस सुरू आहे, आजचा एक दिवस पावसाचा अंदाज आहे, अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस झालेला आहे, पंचनामे सुरू आहेत, 24 जिल्ह्यात पाऊस झालेला आहे, 25 ते 30 हजार हेक्टरवर नुकसान झाले आहे. पंचनामे झाल्यावर सरकाराच्या पातळीवर मदत करू अशी घोषणा कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली आहे. कांदा, द्राक्ष, गहू आणि फळ बागांचे देखील नुकसान झाले आहे. आपत्ती व्यवस्थापन च्या मधमयातून मदत केली जाणार आहे. मी देखील आज प्रत्यक्ष जाऊन पाहणी करणार आहे, एक रुपया पीक विमा बाबत पुन्हा एकदा पुनर्गठन करण्यात येणार आहे, अशी प्रतिक्रिया कृषिमंत्र्यांनी दिली.