जेएनएन, मुंबई. Amaravati Farmer Suicide: महाराष्ट्र राज्यात अनेक पक्षाचे सरकार येऊन गेले. शेतकरीचे मते मिळवून सत्ता भोगून गेले. परंतु जगाचा पोशिंदा मात्र आज आत्महत्या करत आहे. राज्यात शेतकरी आत्महत्याचे प्रमाण अजूनही कमी झाले नाही. विदर्भाच्या अमरावती विभागात 21 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.
आत्महत्याचा हा आकडा महाराष्ट्र राज्याला धक्का देणारा आहे. अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा या जिल्हात सर्वात जास्त शेतकऱ्यांची आत्महत्या झाल्याचा अहवाल महाराष्ट्र अॅक्शन पेस्टीसाइड पॉयझन परसन संस्थाने दिला आहे.
25 वर्षात 21 हजार शेतकरीने केली आत्महत्या
यवतमाळ आणि अमरावती जिल्हात सर्वात जास्त शेतकारीने आत्महत्या केली आहे अशी माहिती या संस्थाने दिली आहे. महाराष्ट्र अॅक्शन पेस्टीसाइड पॉयझन परसनच्या माहितीनुसार, गेल्या 25 वर्षात 21 हजार शेतकरीने आत्महत्या केली आहे. गेल्या २४ वर्षात अमरावती विभागात 21 हजार 286 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. महाराष्ट्र अॅक्शन पेस्टीसाइड पॉयझन परसन संस्थाच्या अहवाल अनुसार बदलते हवामान, शेतीचा वाढता उत्पादन खर्च, शेतीमालला योग्य बाजार भाव न मिळणे, कर्जबाजारीपणा सारखे आत्महत्याचे प्रमुख कारण दिले आहे.
असा आहे संस्थेचा अहवाल !
- अमरावती विभागाच्या पाच जिल्ह्यात 24 वर्षात 21 हजार 286 शेतकरी आत्महत्या केली आहे. यामध्ये अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ या 5 जिल्ह्यांचा समावेश आहे
- यवतमाळ आणि अमरावतीमध्ये सर्वात जास्त आत्महत्या झाले आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती आत्महत्या?
अहवालात नमूद केले आहे की, गेल्या 24 वर्षांत अमरावती जिल्ह्यात 5,395, अकोला जिल्ह्यात 3,123, यवतमाळ जिल्ह्यात 6,211, बुलढाणा जिल्ह्यात 4,442 आणि वाशीम जिल्ह्यात 2,048 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.
जानेवारी 2025मध्ये, अमरावती जिल्ह्यात 10, अकोला जिल्ह्यात 10, यवतमाळ जिल्ह्यात 34, बुलढाणा जिल्ह्यात 10 आणि वाशीम जिल्ह्यात 7 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.
हेही वाचा - Aurangzeb Tomb: औरंगजेबाच्या कबरीची ASI ने सुरक्षा वाढवली, केंद्रीय मंत्र्यांची राज्यसभेत माहिती
9,740 प्रकरणांमध्ये मदत देण्यात आली
अहवालात म्हटले आहे की, 24 वर्षांतील एकूण आत्महत्यांपैकी 9,970 प्रकरणे (सरकारी मदतीसाठी) पात्र ठरली, 10,953 अपात्र ठरली, तर 319 प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. 9,740 प्रकरणांमध्ये मदत देण्यात आली आहे, असे अहवालात म्हटले आहे.
हेही वाचा - Nanded Accident: ट्रॅक्टर विहिरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांनी केली मदतीची मोठी घोषणा
काय म्हणाले संस्थेचे संचालक!
राज्यात शेतकरी आत्महत्याची अनेक कारणे आहेत. मुळात राज्यात शेतकरीची आत्महत्या करणे हीच दुखाची बाब आहे. नापिकी, बदलते हवामान, रास्त भाव न मिळणे, शेतमाल खराब होने आणि कर्जबाजारीपणा मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणे ही शेतकरी आत्महत्येची प्रमुख कारणे आहेत, अशी माहिती महाराष्ट्र अॅक्शन पेस्टीसाइड पॉयझन परसन संस्थाचे संचालक देवानंद पवार यांनी दिली आहे. राज्य सरकारचे शेतकऱ्यांकडे सतत होत असलेले दुर्लक्ष ही सुद्धा एक प्रमुख कारण आहे, असं पवार यांनी सांगितले.