जेएनएन, मुंबई Maharashtra Rains. राज्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यातच आता आजही हवामान विभागाने कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी (Weather update today) केला आहे. पुण्यासह अनेक जिल्ह्यांना येलो अलर्टही दिला आहे.

या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

  • येलो अलर्ट- रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, पुणे घाट, कोल्हापूर, घाट, कोल्हापूर, सातारा, सातारा घाट, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, 
  • ऑरेंज अलर्ट- चंद्रपूर, गडचिरोली, यतवमाळ,

अजित पवारांचा मोठा निर्णय

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि विधानपरिषद आमदार आपला एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही माहिती दिली असून, महाराष्ट्रातील महापुराच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई देणार

    अतिवृष्टीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेवगाव तालुक्यातील भगूर व पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. पुढील 10 दिवसांत पंचनामे पूर्ण करून दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई देण्याची ग्वाही दिली.