जेएनएन, मुंबई. अतिवृष्टीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेवगाव तालुक्यातील भगूर व पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. पुढील 10 दिवसांत पंचनामे पूर्ण करून दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई देण्याची ग्वाही दिली.

ई-पीक पाहणीला मुदतवाढ

अहिल्यानगर जिल्ह्यात अतिवृष्टीने 7.49 लाख एकर शेतीचे नुकसान झाले आहे. यापैकी 6.34 लाख एकर गेल्या महिन्यात बाधित झाले आहे. कृषीमंत्री भरणे यांनी शेत, फळबागा, पशुधन, घरांचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. एनडीआरएफ/एसडीआरएफ निकषांनुसार शासकीय मदत केली जाईल. तसंच, ई-पीक पाहणीला मुदतवाढ देण्यात आली आहे.

अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही लवकरच होईल

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांना गृहोपयोगी साहित्य, किराणा व तातडीची मदत देण्याचे निर्देश दिले आहे. ओढ्या-नाल्यांवरील अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही लवकरच होईल असं आवाहन दिलं. तसंच, पीक विमा कंपन्यांना तातडीने मदत देण्याचे आदेश दिले आहेत. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असं ते म्हणाले.