जेएनएन, बुलढाणा. Buldhana Crime News: बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमध्ये प्रेमप्रकरणतून एक धक्कादायक घटना घडली आहे. खामगावातील सजनपुरी परिसरातून भयंकर घटना समोर आली आहे. प्रियकराने अगोदर प्रेयसीची निर्घृण हत्या केली आणि नंतर स्वतः आत्महत्या केल्याची माहिती आहे.
प्रेमी युगुलांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात
खामगावात 23 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा हा घटना झाली झाली. येथील एका लॉजवर ही घटना घडली आहे. प्रथमदर्शीनी सांगितले की, प्रेमी युगुलांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
साहिल उर्फ सोनू राजपूत (वय 22 वर्षे, राहणार साखरखेर्डा तालुका सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा) आणि ऋतुजा पद्माकर खरात (राहणार शिंदी, तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा) अशी प्रेमी युगुलाची नावे आहे.
चाकूचे सपासप वार
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील बायपास परिसरात असलेल्या हॉटेल जुगनूमध्ये काल (मंगळवारी, ता 23) सायंकाळी साखरखेर्डा येथील या प्रेमीयुगुलाने रूम भाड्याने घेतली होती. एकाच खोलीत हे दोघेही दुपारपासून थांबलेले असल्याची हॉटेलकडून पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. दोघांमध्ये शाब्दिक वाद झाल्यानंतर प्रियकराने प्रेयसीची भोसकून हत्या केली व त्यानंतर स्वतःलाही चाकूने सपासप वार करत संपवलं, अशी प्राथमिक माहिती आहे.
चारित्र्याच्या संशयावरून...
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. याप्रकरणी मिळालेल्या आधिक माहितीनुसार, चारित्र्याच्या संशयावरून प्रियकराने प्रेयसीची हत्या करून स्वतःलाही भोसकून आत्महत्या माहिती पोलिस तपासातून पुढे आली आहे.
पोलिसांनी सांगितलं...
या प्रकरणाबाबत बोलताना खामगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील म्हणाले की, प्रेयसीची हत्या केल्यानंतर प्रियकराने स्वतःला धारदार शस्त्राने भोसकून आत्महत्या केली. या घटनेत दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला, असे प्रथमदर्शनी तपासात समोर येत असून, पुढील तपास सुरू आहे.