जेएनएन, मुंबई. Maharashtra Weather Latest Update: राज्याच्या समुद्री किनारी 5 चक्रीवादळे निर्माण झाल्याने मध्य आणि वायव्य भारतात पाऊस, वादळ आणि विजेसह जोरदार मुसळधार पाऊस पडला आहे.
मुंबई, विदर्भातील काही जिल्ह्यात विजेच्या कडकडाटसह जोरदार मुसळधार पाऊस पडला आहे. यामुळे विदर्भातील काही जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. पुढील 24 तासात मुसळधार आणि वादळांचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मुंबईत पावसाचा इशारा
भारतीय हवामान विभागाने तामिळनाडूतील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची सूचना जारी केली आहे, ज्यामध्ये वादळ, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर पुढील 24 तासात मुंबईत पाऊस आणि गडगडाटी वादळे होतील असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
विदर्भ आणि मराठवाडामध्ये मुळसधार पाऊस हजेरी लावली आहे. यामुळे विदर्भ, मराठवाडा, उर्वरित महाराष्ट्राला सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील या तालुक्यात नुकसान
वादळी आणि मुसळधार पावसामुळे यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी, पुसद, दिग्रस, महागाव, घाटंजी, कळंब, वणी, नेर या 9 तालुक्याचे मोठे नुकसान झाले आहे. या 9 तालुक्यामधील एकुण 1815 घरांचे आणि गोठ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर एकाच मृत्यू झाला असून 57 जनावरे दगवली आहेत. मुसळधार पाऊसमुळे केळी, संत्रा, लिंबू, पपई, तीळ, ज्वारी फळबागसहित 162 हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे.