जेएनएन, मुंबई. Maharashtra Politics News: काँग्रेस नेते आणि आमदार नाना पटोले यांनी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूकमधील धांधली प्रकरणाची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी करण्याची मागणी केली आहे.
‘महायुतीचं सरकार बरखास्त करा’
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूकबाबत आक्षेप घेतला आहे, त्यांची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी करण्याची मागणी पटोले यांनी पत्राद्वारे राष्ट्रपतींना केली आहे. उच्चस्तरीय चौकशी होईपर्यंत राज्यातील महायुतीचं सरकार बरखास्त करावे, अशी मागणी केली आहे. सोबतच राज्यात पुन्हा पारदर्शक विधानसभा निवडणूक घेण्याची विनंती पटोले यांनी राष्ट्रपती यांना केली आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील कथित अनियमितता आणि मतांची विश्वसनीयता यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी राष्ट्रपतींकडे थेट उच्चस्तरीय न्यायिक चौकशीची मागणी पटोले यांनी केली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या संभाव्य गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी आणि सध्याचे सरकार बरखास्त करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची मागणी पत्राद्वारे महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना केली. pic.twitter.com/DtKq0iWgv5
— Nana Patole (@NANA_PATOLE) June 12, 2025
राज्यातील 82 विधानसभा मतदारसंघांतील सुमारे 12,000 मतदान केंद्रांवर प्रक्रियात्मक अनियमितता आढळून आली असून, त्यामुळे कोट्यवधी मतांची विश्वसनीयता धोक्यात आली आहे, असे ही पटोलेंनी पत्रात नमूद केले आहे.
राज्यातील गाव, शहर, आदिवासी भागातील सामान्य मतदार यांचीही हीच चिंता आहे. "निवडणुका पारदर्शक झाल्या का?", "आमचे मत कुणीतरी दुसऱ्याच्या खात्यात तर टाकले नाही ना?" अशा अनेक प्रश्नांनी नागरिक चिंतित आहेत, असेही पटोले यांनी पत्रात नमूद केले आहे.
या दोन प्रमुख केल्या मागण्या
- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील कथित अनियमिततेची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी करावी.
- तपास पूर्ण होईपर्यंत सध्याची राज्य सरकार बरखास्त करावे आणि नवीन निवडणुकीची प्रक्रिया सुरू करावी.
हेही वाचा - Congress Mashaal March: काँग्रेसचा राज्यभर मशाल मोर्चा! विधानसभेत ‘मतचोरी’ केल्याचा आरोप