मुंबई - Maharashtra Weather Update : भारतीय हवामान विभागाने 29 ऑगस्ट रोजी राज्यातील २३ जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. कोकण व घाटमाथ्यावर जोरदार पाऊस बरसत असून विदर्भ व मराठवाडाही पावसाने व्यापला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत जोरदार पावसासह वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशभरात मान्सून सक्रीय असून अनेक ठिकाणी अतिवृष्टी, पूर व भूस्खलनामुळे अनेक बळी गेले आहेत. 

कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला असून 40-50 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची व विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्याचबरोबर घाटमाथा व  पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सांगली येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे. 

मराठवाडा विदर्भाला इशारा - 

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड आणि नांदेड या ठिकाणी मध्यम ते जोराचा पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तर काही ठिकाणी हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली आणि वर्धा या ठिकाणी मुसळधार पावसासह विजांच्या कडकडाटाची हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे. नाशिक, धुळे आणि जळगाव या भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची हवामान विभागाने शक्यता जारी केली आहे.

राजस्थान व तेलंगाणात पुराने हाहाकार -

डोंगराळ प्रदेशाबरोबरच राजस्थान आणि दक्षिण भारतातील अनेक राज्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तेलंगाणातील दोन जिल्हे कामारेड्डी आणि मेडक मध्ये गेल्या 24 तासात झालेल्या पावसाने 50 वर्षाचा विक्रम मोडला आहे. राष्ट्रीय महामार्ग 44 तीन ठिकाणी वाहून गेला आहे.

    दिल्ली-एनसीआरला पावसाने झोडपले -

    दिल्ली-एनसीआरमध्ये शुक्रवारी सकाळी मुसळधार पाऊस झाला. पावसाने लोकांना उका्ड्यापासून दिलासा मिळाला मात्र रस्त्यावर पाणी साचल्याने लोकांना अडचणींचा सामना करावा लागला. शुक्रवार सकाळपासून दिल्ली परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. 

    दिल्ली-NCR मध्ये गेल्या काही दिवसापासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. दरम्यान IMD ने आज पुन्हा हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे कमाल तापमान 30 डिग्री, तर किमान तापमान 1 डिग्री कम 23.5 डिग्री सेल्सियसपर्यंत राहण्याचा अंदाज आहे.