मुंबई - दक्षिण मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरंगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ईस्टर्न फ्री वे आणि सायन-पनवेल महामार्ग आपत्कालीन सेवा वगळता सर्व वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. मुंबईत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. आंदोलक मोठ्या संख्येने आझाद मैदानात दाखल आहे. आझाद मैदान परिसरात उत्साह आणि तणावाचं वातावरण आहे.

शुक्रवारी ईस्टर्न फ्री वे आणि सायन-पनवेल महामार्ग आपत्कालीन सेवा वगळता सर्व वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. गुरुवारी संध्याकाळी अतिरिक्त पोलिस आयुक्त (वाहतूक) यांनी हा आदेश जारी केला.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी शुक्रवारपासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू करणार असल्याचे कार्यकर्ते मनोज जरांगे यांनी जाहीर केले आहे. बुधवारी जालना जिल्ह्यातील आपल्या गावापासून मोर्चाला सुरुवात करणारे जरांगे शेकडो वाहनांसह शुक्रवारी सकाळी मुंबईत दाखल झाले.

सायन पनवेल महामार्ग, ईस्टर्न फ्री वे राहणार बंद -

पनवेल-सायन रोड, व्हीएन पुरव रोड, ईस्टर्न फ्रीवे, पी डी'मेलो रोड, वालचंद हिराचंद मार्ग, डॉ. दादाभाई नौरोजी रोड आणि हजारीमल सोमाणी रोड हे आपत्कालीन सेवा वाहने वगळता सर्व प्रकारच्या वाहन वाहतुकीसाठी बंद राहतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. हा आदेश शुक्रवारी सकाळी ६ वाजल्यापासून पुढील आदेश येईपर्यंत लागू राहील, असेही त्यांनी सांगितले. 

रॅलीचे आयोजन -

    मराठा आरक्षणची रॅली मुंबईतील आझाद मैदान येथे आयोजित करण्यात आली आहे. राज्यभरातून आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात मुंबई गाठली आहे. तर मैदानात गर्दी वाढत आहे. मनोज जरांगे पाटील यांचा ताफा पहाटेच नवी मुंबईच्या वाशी येथे दाखल झाला आहे. हजारो आंदोलकांच्या गाड्या शहरात दाखल झाले आहे. मुंबईत  अंदाजे साडेसहा हजार गाड्या दाखल झाले असल्याची माहिती आहे.

    रॅलीमुळे वाहतुकीवर परिणाम-

    मोठ्या प्रमाणातील गर्दी आणि गाड्यांच्या लोंढ्यामुळे मुंबईत वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. मुंबई वाहतूक विभागाने नागरिकांना पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे.

    मुंबईत मार्गावरील वाहतूक वळवली -

    वाशी मार्गाने येणाऱ्या वाहनांसाठी : साऊथ बॉण्डवरील वाहतूक पांजरपोळ आणि फ्री-वे मार्गे वळवली जाणार आहे.

    दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असल्याने अनावश्यक प्रवास टाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

    लोकल आणि मेट्रोसारख्या सार्वजनिक वाहतूक सेवांचा उपयोग करण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे.

    मार्गात बदल वाहनांना बंदी!

    • छेडानगरवरून फ्रीवेना जाणाऱ्या सर्व वाहनांना बंदी.
    •  सी. जी. गिडवाणी उत्तर वाहिनीवरून पांजरपोळकडे येणारा मार्ग
    • फ्री-वे उत्तर वाहिनीवरून पांजरपोळ जंक्शन येथे खाली उतरणारा मार्ग 
    • आय. ओ. सी. जंक्शन आणि गोवंडी रेल्वे ब्रिजकडून फ्री-वेवर दक्षिण वाहिनीवर जाणार मार्ग
    • व्ही. एन. पुरय मार्गावरून साऊथ बॉण्डने पांजरपोळ-फ्री-वेकडे जाणार मार्ग
    • देवनार फार्म रोड मार्गाकडून पांजरपोळकड़े ट्रॉम्बे चिता कॅम्पकडून व्ही. एन. पुरच मार्गावरून फ्री-वेला व पांजरपोळकडे जाणारा मार्ग 
    •  सायन पनवेल मार्गावरून पांजरपोळकडे येणारा मार्ग
    • वामन तुकाराम पाटील मार्गावरून पांजरपोळ जंक्शन येथून फ्री-वे उत्तर वाहिनी मार्गिका