Maharashtra Weather Update: राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. यातच आता पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन हे हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (6 जुलै) पहाटे एका घरावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. भूस्खलन आणि सततच्या मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग (Expressway) आणि जुना मुंबई-पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतुकीवर गंभीर प्रभावित झाली आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत दोन्ही दिशांची (पुणे-मुंबई आणि मुंबई-पुणे) वाहतूक थांबवण्यात आली आहे. राज्यात सुरु असलेल्या पावसाचे लाईव्ह अपडेट…

  • 2026-07-06 14:43:47

    नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा - फडणवीस

    राज्यातील अतिवृष्टी आणि बदलत्या नैसर्गिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाची संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगून अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.  विधानसभेत राज्यातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थिती बाबत माहिती देताना मुख्यमंत्री बोलत होते.
  • 2026-07-06 14:41:56

    मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

    मुंबई-गोवा महामार्गा वर कशेडी जवळ येथे दरड कोसळली आहे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबईकडून गोवा जाणारी वाहतूक प्रभावित झालेली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण च्या यंत्रणेकडून अडथळे दूर करून वाहतूक नियमित करण्यासाठी काम केले जात आहे. परिसरात पाऊस व वारा जोरदार आहे. सदर दरडीचा काही भाग जवळ घरांच्या परिसरात आल्याने त्या परिसरातील लोकांनी सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.
  • 2026-07-06 14:38:11

    राज्यात आणीबाणी जाहीर करावी - खासदार सुप्रिया सुळे

    मुंबई-पुणे दळणवळण पूर्णपणे विस्कळीत झाले असून, मिसिंग लिंक प्रकल्प, दरडी कोसळण्याच्या घटना, मानखुर्द दुर्घटना आणि पावसामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने राज्यात आणीबाणी जाहीर करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.
  • 2026-07-06 13:51:00

    पुण्यात दरड कोसळून घर गाडले; एकाचा मृत्यू, दोघे बेपत्ता

    पुणे जिल्ह्यात सोमवारी मुसळधार पावसानंतर दरड कोसळून एका कुटुंबाचे घर मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, कुटुंबातील अन्य दोन बेपत्ता सदस्यांचा शोध सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही घटना मावळ तालुक्यातील पाटण गावात घडली. पहाटेच्या सुमारास गावात दरड कोसळल्याने एका कुटुंबाचे घर मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आणि त्यात कुटुंबातील तीन सदस्य अडकले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
  • 2026-07-06 13:01:47

    देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात पावसाची आणि पाणी साचल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला; तसेच सद्यस्थिती आणि करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली.
  • 2026-07-06 12:29:03

    Mumbai Local News: कांजूरमार्ग आणि भांडुप दरम्यान तांत्रिक बिघाड

    Mumbai Local slow line halted: ओव्हरहेड इलेक्ट्रिफिकेशन (OHE) वर प्लास्टिक अडकल्यामुळे कांजूरमार्ग आणि भांडुप दरम्यान CSMT च्या दिशेने जाणाऱ्या 'स्लो' मार्गावरील लोकल सेवा थांबवण्यात आली आहे. सविस्तर वाचा -
  • 2026-07-06 12:08:24

    विक्रोळी पश्मिचमध्ये सर्वाधिक 248 मिमी पाऊस 

    विक्रोळी पश्मिचमध्ये सर्वाधिक 248 मिमी पाऊस Image
  • 2026-07-06 12:06:40

    मुंबईत ताशी 90  किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता

    भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगर क्षेत्रासाठी अतिवृष्टीचा इशारा (Red Alert) जारी केला असून ताशी 80 ते 90  किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (State Disaster Management Authority) यांनी मुंबईतील सर्व खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याचे (Work From Home) निर्देशित केले आहे.
  • 2026-07-06 12:03:40

    पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी

    मुसळधार पाऊस आणि उरसे टोल प्लाझाजवळ झालेल्या दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.  
  • 2026-07-06 11:40:40

    Mumbai News: सरकारी कार्यालये केवळ अर्धा दिवस चालू

    मुंबईसाठी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार, खाजगी कार्यालयांना शक्य असेल तिथे कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी देण्यास सांगण्यात आले आहे. हवामानाच्या परिस्थितीमुळे शहरातील अत्यावश्यक नसलेली सरकारी कार्यालये केवळ अर्धा दिवस चालू राहतील.

    सविस्तर वाचा - 
  • 2026-07-06 11:33:59

    विरोधकांची विधीमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी

    पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाली. जनतेला मॅनहोल मध्ये मारणाऱ्या सरकारचा निषेध करत विरोधकांनी पायऱ्यांवर आंदोलन केले. हरवला हरवला इन्फ्रामॅन हरवला, मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या सरकारचा निषेध करत विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली.
  • 2026-07-06 11:30:12

    Monsoon Session 2026: विधानसभेचे आजचे कामकाज पूर्ण दिवसासाठी स्थगित

    मुंबईतील पावसाची स्थिती पाहता विधानसभेचे आजचे कामकाज पूर्ण दिवसासाठी स्थगित केले आहे.
  • 2026-07-06 11:18:40

    मानखुर्दमध्ये चाळ कोसळल्याने सहा जण ठार

    मुंबईतील मानखुर्द भागात रविवारी रात्री मुसळधार पावसात तीन मजली चाळ कोसळल्याने किमान सहा जण ठार झाले आणि एक जण जखमी झाला. सविस्तर वाचा - 
  • 2026-07-06 11:18:03

    Mumbai School Holiday: मुंबईतील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुटी जाहीर

    भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगराला सोमवार, दिनांक 6 जुलै 2026 रोजी मुसळधार पावसाचा (Orange Alert) तसेच सोसाट्याचे वारे वाहतील असा इशारा दिला आहे. सविस्तर वाचा -
  • 2026-07-06 11:15:30

    Missing Link Landslide: 'मिसिंग लिंक' बोगद्याजवळ दरड कोसळली

    Mumbai-Pune Expressway Landslide: दोन महिन्यांपूर्वी खुला झालेला मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील 'मिसिंग लिंक' च्या टनेल 2 च्या बाहेर पडण्याच्या मार्गाजवळ दरड कोसळली आहे. सविस्तर वाचा - 
  • 2026-07-06 11:14:37

    Mumbai News: मुंबई विद्यापीठाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या

    सोमवार दिनांक 6 जुलै 2026 रोजी होणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या सर्व परीक्षा मुसळधार पावसाचा ( Orange Alert) तसेच सोसाट्याचे वारे वाहतील असा इशारा आणि स्थितीच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आले आहेत असे मुंबई विद्यापीठ च्या वतीने कळविण्यात आले आहे
  • 2026-07-06 11:10:32

    Patan News- पाटणमध्ये दरड कोसळली

    मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (6 जुलै) पहाटे एका घरावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. सविस्तर वाचा