जेएनएन, मुंबई. School Holiday in Mumbai: भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगराला सोमवार, दिनांक 6 जुलै 2026 रोजी मुसळधार पावसाचा (Orange Alert) तसेच सोसाट्याचे वारे वाहतील असा इशारा दिला आहे.

कार्यालये नियमितपणे सुरू

या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा व महाविद्यालयांना दिनांक 6 जुलै 2026 रोजी सुटी जाहीर करण्यात येत आहे. मात्र, शासकीय व खासगी कार्यालये नियमितपणे सुरू राहतील. 

नागरिकांनी घराबाहेर पडू नये

आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असेदेखील आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मुंबईत चाळ कोसळली

    मुंबईतील मानखुर्द भागात रविवारी रात्री मुसळधार पावसात तीन मजली चाळ कोसळल्याने किमान सहा जण ठार झाले आणि एक जण जखमी झाला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.  ढिगाऱ्याखाली एक जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून, त्याला शोधण्यासाठी 'नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स' (NDRF) च्या जवानांसह विविध यंत्रणांचे बचावकार्य सुरू आहे.