जेएनएन, मुंबई. Maharashtra Politics News: महाविकास आघाडीत शेतकरी कामगार पक्ष नाराज आहेत. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. शेकापची नाराजी दूर करण्यासाठी 2 ऑगस्ट रोजी शेकापच्या कार्यकर्त्यांना  राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.

2 ऑगस्ट रोजी पनवेल येथे शेतकरी कामगार पक्ष 78 वा वर्धापन दिन सोहळा साजरा करत आहे. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. राज ठाकरे शेकापच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती शेकापचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. 

आगामी स्थानीक स्वराज संस्थाच्या निवडणुकीत शेतकरी आणि कामगार यांची प्रमुख भूमिका असणार आहे. यामुळे शेतकरी आणि कामगारला एकत्र करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

कोकण विभागात शेतकरी कामगार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना सहित मनसे आपली ताकद वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. आगामी स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीत तीनही पक्ष एकत्र येऊन कोकण काबीज करण्याचा प्रयत्न करणार आहे. पनवेलमधील राज ठाकरे यांचा भाषण शेकापची नाराजी दूर करणार आहे, असा विश्वास मनसे नेत्यांनी व्यक्त केला आहे. 

ठाकरे बंधूंची वज्रमूठ

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत असल्याने राज्यातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे. आगामी स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणूकसाठी दोन्ही बंधु एकत्र आले तर भाजपा आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेनाची अडचण वाढली आहे.