जेएनएन, मुंबई. Maharashtra Politics News: महाराष्ट्र राज्यात हिंदी सक्ती विरोधी आणि मराठी भाषेच्या समर्थनात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे  एकत्र मोर्चा काढणार होते. मात्र राज्य सरकारने हिंदी सक्तिबाबतचा निर्णय मागे घेतल्याने ठाकरे बंधू पाच जुलै रोजी वरळी येथील डोममध्ये विजयी मेळावा घेणार आहे, अशी माहिती उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना मुखपत्र सामनामध्ये प्रकाशित करण्यात आली आहे. 

ठाकरे बंधू पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावरून कार्यकर्त्याला मार्गदर्शन करणार असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकित एकत्र लढण्याचे संकेत ही देण्यात येणार आहे. भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेची शिवसेना ठाकरे बंधूंच्या टार्गेटवर असणार आहे. अनेक दिवसापासून दोन्ही ठाकरे बंधू वेगळे असल्याने इतर पक्षला राजकीय फायदा मिळत होता. मात्र आता उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येत असल्याने इतर पक्षाला राजकीय फायदा होणार नसून शिवसेना आणि मनसेला फायदा होणार आहे.

दोन्ही पक्षाचे नेते एकत्र आले! 

5 जुलै रोजी होणाऱ्या विजयी मेळावाची तयारी उद्धव ठाकरे शिवसेना आणि मनसेचे नेते एकत्र करत आहे. वरळी येथील डोम सभागृहात हा मेळावा पार पडणार आहे. मेळाव्यासाठी दोन्ही पक्षाचे नेते एकत्र काम करत आहे.

संजय राऊतांचे ट्वीट

ठरलं, 5 जुलै मराठीचा विजयी मेळावा! ठाकरे येत आहेत, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट केले आहे.