जेएनएन, मुंबई. Maharashtra Monsoon Session 2025: विधानभवनातील विधिमंडळाच्या पायऱ्यांवर शेतकऱ्यांवर अन्यायकारक ठरणारा शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.

एकाच जिद्द, शक्तिपीठ रद्द, शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आल्या.

महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे प्रणेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मुंबई येथील विधान भवन परिसरातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. राज्याला अन्नधान्यात स्वयंभू बनणाऱ्या या लोकनेत्याच्या स्मृतींना यावेळी उजाळा दिला. याप्रसंगी महाविकास आघाडीचे आमदार उपस्थित होते. त्यानंतर विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जाऊन आंदोलन केलं.

'गझनी सरकार' म्हणत रोहित पवारांची इंट्री

राष्ट्रवादी काँग्रेस (सपा) नेते रोहित पवार (Rohit Pawar) 'गझनी सरकार' असे लिहिलेले पोस्टर घेऊन विधानसभेत पोहोचले. महाराष्ट्र सरकार आज कृषी दिन साजरा करणार आहे. मात्र, या गझनी सरकारला शेतकऱ्यांना केलेल्या आवाहनाचा विसर पडला आहे. सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करु अशी घोषणा केली होती. मात्र, ती घोषणाच राहिली असं रोहित पवार म्हणाले. महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीपूर्वी त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले.

हेही वाचा - Maharashtra Monsoon Session 2025: नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करण्यासाठी विधेयक सादर