जेएनएन, मुंबई: काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पक्षात जाऊन संग्राम थोपटे यांना लॉटरीच लागली आहे. राज्य सरकार कडून थोपटे यांच्या कारखान्याला कर्जाची हमी दिल्याने अर्थमंत्री अजित पवार चांगलेच संतापले आहे.

467 कोटी रुपयांच्या कर्जाला सरकारची हमी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पुणे जिल्ह्यातील राजगड सहकारी साखर कारखाना अनंतनगर-निगडे, ता. भोर राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC) कडून मिळणाऱ्या 467 कोटी रुपयांच्या कर्जाला राज्य सरकारने हमी देण्याचा निर्णय घेतला आहे. यावर अजित पवार चांगलेच संतापले.

अजित पवारांची तीव्र नाराजी

यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तीव्र नाराजी व्यक्त करत हा कारखाना बंद पडलेला असताना सरकारने एवढी मोठी हमी का द्यावी, असा सवाल ही उपस्थित केला.भाजप नेते संग्राम थोपटे यांच्या मालकीच्या या साखर कारखान्याला मदत करण्यावरूनच वाद निर्माण झाला. 

अजित पवारांच्या विरोधानंतर वातावरण तापले असले तरी मुख्यमंत्री फडणवीस यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न करत, यापूर्वीही अनेक साखर कारखान्यांना अशा प्रकारे हमी देण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र अजित पवार यांनी संग्राम थोपटे यांच्या कारखान्याला कर्जाची हमीचा विरोध कायम ठेवला आहे.