जेएनएन, मुंबई. Mumbai News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार गटात पुन्हा मतभेद दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर अनेक युवा कार्यकर्ते आणि आमदार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
शरद पवार गटाचे आमदार हे जयंत पाटील यांच्याकडून होत असलेल्या नियुक्तींना विरोध करत आहेत. शरद पवार गटाच्या अनेक तरुण नेत्यांनी जयंत पाटील यांच्या नेतृत्वावर शरद पवार यांच्यासमोर नाराजी व्यक्त केली आहे.
जयंत पाटील यांच्या कार्यशैली विरोधात पक्षात नाराज युवकांनी मोर्चा उघडला आहे. जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष पदावर पुन्हा नियुक्ती होण्या आधीच अनेकांना बड्या पदांचे वाटप करत असल्याने पक्षातील अनेक तरुण नेत्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याची माहिती समोर आली आहे.
जयंत पाटलांच्या या कायशैलीमुळे शरद पवार गटातील तरुण नेतृत्वात आणि आमदारांमध्ये मोठी फूट पडली असल्याची माहिती समोर आली आहे.
जयंत पाटील यांनी गेल्या काही दिवसात आपल्या जवळीक व्यक्तीला बड्या पदावर नियुक्ती केल्याने सद्य पक्षात जोरदार नाराजीचे सूर आहे. शरद पवार या नाराजीला कशी दूर करतात, याकडे पक्षांच्या कार्यकर्त्याचा लक्ष लागले आहे.
