जेएनएन, मुंबई. बहुप्रतिक्षेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सुरुवात झाली आहे. राज्यात पहिला टप्प्यात 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतीच्या (एकूण 288) सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार आहे.  तर 3 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी (Municipal Council Election 2025) होणार आहे.

जिल्हा परिषद - महापालिकांच्या निवडणुका कधी होणार?

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या कार्यक्रमाची सचिवालय जिमखान्यात झालेल्या पत्रकार परिषदेत आयोगाने घोषणा केली आहे. नगर परिषद आणि नगर पंचायती नंतर जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुका कधी होणार आहेत, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

निवडणूक आयुक्त काय म्हणाले…

निवडणूक आयोगाच्या राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांना पत्रकार परिषदेत महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होतील आणि 31 जानेवारीच्या आधी निवडणुका घेऊ शकाल याबद्दल खात्री आहे का? असा पश्न पत्रकारांकडून करण्यात आला, यावर उत्तर देताना  राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले, "31 जानेवारीच्या पूर्वी आम्हाला सगळ्या निवडणुका घ्यायच्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे तसे आदेश आहेत. कोणत्याही परिस्थिती निवडणुका घ्या, असे आदेश आहेत."

    नगर परिषद आणि नगर पंचायती महत्वाच्या तारखा 

    • नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरुवात - 10 नोव्हेंबर 
    • नामनिर्देशनपत्रची दाखल करण्याची अंतिम मुदत 17 नोव्हेंबर 
    • नामनिर्देशनपत्रांची छाननी - 18 नोव्हेंबर
    • अपील नसलेल्या ठिकाणी नामनिदेशनपत्र माघारीची अंतिम मदुत- 21 नोव्हेंबर
    • अपील असलेल्या ठिकाणी नामनिदेशनपत्र माघारीची अंतिम मुदत 25 नोव्हेंबर
    • मतदानाचा दिवस - 02 डिसेंबर
    • मतमोजणीचा दिवस - 03 डिसेंबर 2025

    हेही वाचा - Local Body Election 2025 Date Highlights: 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर, ईव्हीएम द्वारेच 2 डिसेंबरला मतदान