जेएनएन, मुंबई. Local Body Election 2025 Date: मुंबई महापालिकेसह (BMC) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज सायंकाळी 4 वाजता पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.

राज्यात 2 डिसेंबरला मतदान

राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायर्तीच्या (एकूण 288) सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान. तर 3 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी (Municipal Council Election 2025) होणार असल्याने या सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.

  • 2025-11-04 18:22:05

    Nagar Parishad-Panchayat Election - एकूण मतदार व मतदान केंद्र 

    एकूण मतदार व मतदान केंद्र
    • मतदार- 53,79,931
    • महिला मतदार- 53,22,870
    • इतर मतदार- 775
    • एकूण मतदार- 1,07,03,576
    • एकूण मतदान केंद्र- सुमारे 13,355
    सविस्तर वाचा -Municipal Council Election Date: राज्यातील 288 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान, आजपासून आचारसंहिता लागू
  • 2025-11-04 17:26:40

    नगरपरिषद- नगर पंचायत सविस्तर निवडणूक कार्यक्रम

    राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायर्तीच्या (एकूण 288) सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान; तर 3 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी होणार असल्याने या सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. Municipal Council Election Date: राज्यातील 288 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान, आजपासून आचारसंहिता लागू
  • 2025-11-04 16:26:03

    नगरपरिषद-पंचायत निवडणूक सविस्तर कार्यक्रम

    नामनिर्देशन दाखल - 10 नोव्हेंबर नामनिर्देशन अंतिम तारीख- 17 नोव्हेंबर छाणणी - 18 नोव्हेंबर नामनिर्देशन वापस - 21 नोव्हेंबर नामनिर्देशन (अपिल) - 25 नोव्हेंबर निवडणूक चिन्ह - 26 नोव्हेंबर मतदान - 2 डिसेंबर मतमोजणी - 3 डिसेंबर
  • 2025-11-04 16:15:00

    नगरपरिषदेचे मतदान 2 डिसेंबरला

    मतदान - 2 डिसेंबरला मतमोजणी - 3 डिसेंबर
  • 2025-11-04 16:15:26

    नगर परिषद - नगर पंचायत निवडणूक विभाग निघाय

    नगर परिषद - नगर पंचायत निवडणूक विभाग निघाय कोकण - 27 नाशिक - 49 पुणे - 60 छत्रपती संभाजीनगर - 52 अमरावती - 45 नागपूर - 55
  • 2025-11-04 16:15:11

    Municipal Council Election ईव्हीएम द्वारेच मतदान

    नगरपरिषदेची निवडणूक बहुसदस्यीय पद्धतीने होईल. नगरपंचायत एक सदस्यीय पद्धतीने निवडणूक होईल. ईव्हीएम द्वारेच मतदान होईल. मतदारसंघनिहाय मतदारयाद्या 7 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार. 1 कोटी 7 लाख 3 हजार 576 मतदार मतदान करणार.
  • 2025-11-04 16:10:13

    जातवैधता प्रमाणपत्र सहा महिन्यात सादर करावे

    ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. नामनिर्देशन पत्र संकेतस्थळ उपलब्ध असेल. अर्ज करताना जातवैधता प्रमाणपत्र नसेल तर निवडून आल्यानंतर सहा महिन्यात सादर करावे लागेल. एका उमेदवाराला जास्तीत जास्त 4 अर्ज भरता येतील.
  • 2025-11-04 16:09:54

    42 ची नगरपंचायती निवडणूक

    राज्यात 246 नगरपरिषदामध्ये 10 नव्या नगरपरिषदांचा समावेश आहे. राज्यामध्ये 147 नगरपंचायती आहेत. त्यापैकी 42 ची नगरपंचायती निवडणूक होत आहे. 6859 सदस्य, 288 अध्यक्षांची निवड होणार आहे.
  • 2025-11-04 16:04:37

    246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर

    महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली आहे. यामध्ये 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत.
  • 2025-11-04 15:38:40

    State Election Commission: थोड्याच वेळात निवडणुक आयोगाची पत्रकार परिषद

    गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल आज वाजण्याची शक्यता आहे. निवडणुक आयोगाच्या पत्रकार परिषदेला थोड्याच वेळात सुरुवात होत आहे.
  • 2025-11-04 15:34:25

    Local Body Election 2025: 31 जानेवारीपूर्वी निवडणुका घेणे बंधनकारक

    सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार, मुदत संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीपूर्वी घेणे अनिवार्य आहे. यामध्ये राज्यातील मदत संपलेल्या 289 नगरपालिका, 32 जिल्हा परिषदा, 331 पंचायत समित्या आणि 29 महानगरपालिकांचा समावेश असणार आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकांवर केंद्रीत झाले आहे. येत्या तीन महिन्यात धुरळा उडणार आहे.