जेएनएन, मुंबई. महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढू लागला आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यातील तापमानात मोठी घसरण नोंदवली जात आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह अनेक भागांमध्ये रात्रीचे तापमान लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. हवामान विभागाने मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील 11 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे.

कोठे सर्वाधिक परिणाम

  • IMD च्या माहितीनुसार, खालील जिल्ह्यांमध्ये तापमान आणखी घसरण्याची शक्यता असून थंडीची लाट कायम राहणार आहे. 
  • नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, या जिल्ह्यांबरोबरच मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात रात्रीचे तापमान सामान्यपेक्षा कमी नोंदवले जात आहे. 
  • नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे तापमान 8°C पर्यंत घसरले आहे, तर नागपूरमध्ये 9.6°C इतकी नोंद झाली आहे. 
  • पुण्यातही किमान तापमान 10–11°C च्या आसपास नोंदवले जात असून, थंडीचा प्रभाव सातत्याने वाढत आहे.

धुक्याची शक्यता!

घाटमाथ्यावरील भागांमध्ये पहाटेच्या वेळी दाट धुक्याची चादर पसरत असून दृश्यता कमी होत आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहनचालकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.