एजन्सी, पुणे: पुण्यात रेल्वे ट्रॅकवर गैरप्रकार केल्याचा संशय असलेल्या तीन जणांचा ट्रेनने चिरडून मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. रविवारी रात्री पुणे शहराच्या बाहेरील मांजरी परिसरात ही घटना घडली.
रात्री 9 वाजण्याच्या सुमारास…
"प्राथमिक माहितीनुसार, 18 ते 20 वयोगटातील पाच ते सहा तरुण ट्रॅकवरून चालत होते, तर त्यापैकी काही त्यावर बसले होते. रविवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ते काही गैरप्रकार करत असताना एका ट्रेनने त्यांच्यापैकी तिघांना धडक दिल्याचा संशय आहे,” असे हडपसर पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
प्रथमेश नितीन तिंडे, तन्मय महेंद्र तुपे आणि तुषार शिंदे अशी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. हे तरुण मांजरी येथील जवळच्या परिसरातील होते, असे त्यांनी सांगितले.
भरधाव रेल्वेची तिघांना धडक
माहितीनुसार, पुणे-दौंड डेमू रात्री साडेआठच्या सुमारास पुण्याहून दौंडच्या दिशेने निघाली होती. त्यावेळी हे सर्व तरुण रुळाच्या परिसरात एकत्र आले होते. त्यादरम्यान, दौंडच्या दिशेन जाणाऱ्या भरधाव रेल्वेने तिघांना धडक दिली. तर दोघे जण वाचले आहेत.
अपघाती मृत्यूची नोंद
"आम्ही अपघाती मृत्यूची नोंद केली आहे आणि घटनाक्रमाची चौकशी करत आहोत," असे अधिकाऱ्याने सांगितले.
