जेएनएन, मुंबई. Maharashtra ANTF Bharti 2025: राज्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स स्थापन (ANTF Recruitment 2025) करण्यास तसेच त्याकरिताच्या 346 पदांना व त्यासाठीच्या खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

राज्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स स्थापन करण्यासाठी 31ऑगस्ट 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आली आहे. या फोर्ससाठी आवश्यक असणारे 346 पदांच्या मनुष्यबळाचा प्रस्तावास मंजूरी देण्यात आली. यापैकी 310 पदे नियमित असतील तर 36 पदे बाह्य यंत्रणेकडून भरली जाणार आहेत. 

नियमित पदे पुढीलप्रमाणे (पदनाम आणि संख्या) – 

  • विशेष पोलीस महानिरीक्षक- एक,
  • पोलीस उपमहानिरीक्षक एक, 
  • पोलीस अधीक्षक-तीन, 
  • अपर पोलीस अधीक्षक-तीन, 
  • पोलीस अधीक्षक- 10, 
  • पोलीस निरीक्षक 15,
  • सहाय्यक पोलीस निरीक्षक – 15, 
  • पोलीस उपनिरीक्षक – 20, 
  • सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक – 35, 
  • पोलीस हवालदार – 48, 
  • पोलीस शिपाई – 83, 
  • चालक पोलीस हवालदार -18, 
  • चालक पोलीस शिपाई - 32, 
  • कार्यालय अधीक्षक – एक, 
  • प्रमुख लिपीक – दोन, 
  • वरिष्ठ श्रेणी लिपीक -11, 
  • कनिष्ठ श्रेणी लिपीक – सात, 
  • उच्च श्रेणी लघुलेखक – दोन, 
  • निम्न श्रेणी लघुलेखक – तीन.

हेही वाचा - टेस्लाने भारतात सुरू केली Hiring, मुंबईत लागणार फॅक्टरी? PM मोदींसोबतच्या भेटीनंतर मस्क यांचे मोठे पाऊल!

बाह्य यंत्रणेद्वारे भरावयाची पदे ( पदनाम आणि संख्या या क्रमाने) 

    • वैज्ञानिक सहाय्यक-तीन, 
    • विधी अधिकारी – तीन, 
    • कार्यालयीन शिपाई -18, 
    • सफाईगार – 12 एकूण – 36.

    हेही वाचा - Allahbadia Row: मुंबई पोलिसांचे रणवीर अलाहबादियाला तिसरे समन्स, तात्काळ हजर होण्याचे निर्देश

    पदभरतीसाठी एकूण खर्च 

    यासाठी येणाऱ्या आवर्ती खर्च रुपये 19,24,18,380 रुपये (एकोणीस कोटी चोवीस लाख अठरा हजार तीनशे ऐंशी रुपये) तर वाहन खरेदीसह अनावर्ती खर्चास 3,12,98,000 ( तीन कोटी बारा लाख अठ्ठ्याण्णव हजार तीनशे ऐंशी रुपये) मान्यता देण्यात आली.