जेएनएन, मुंबई. Shiv Jayanti 2025: संपूर्ण राज्यात 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या निर्मितीसाठी घेतलेले कष्ट, परिश्रम तर सर्वांनाच माहिती आहे. दूरदृष्टी ठेवणारे शिवाजी महाराजांनी आपल्या नियोजनाने स्वराज्याची निर्मिती केली. छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक असेही म्हटले जाते. स्वराज्यात स्वःताचे आरमार असावे यासाठी महाराजांनी प्रयत्न केले. स्वराज्यात आरमार उभारताना महाराजांची दूरदृष्टी काय होती. कसे उभारले गेले स्वराज्यात आरमार याची माहिती आपण आजच्या या लेखातून घेणार आहोत.
स्वराज्याची स्थापना करताना महाराजांनी प्रत्येक गोष्टीचा सारासार विचार करून नियोजन केले होते. शत्रूने आपल्या राज्यावर हल्ला करू नये यासाठी त्यांनी चहूबाजूंनी आपले सैन्य आणि कडेकोट तटबंदी केली होती. स्वराज्याच्या रक्षणासाठी महाराजांनी आपले आरमार देखील तितकेच सक्षम असावे या दृष्टीने विचार केला होता. शत्रूंना सागरी मार्गाने मिळणारी रसद थांबावी यादृष्टीने त्यांनी कल्याण व भिवंडीचा परिसर काबीज केला. व येथूनच सुरु झाला स्वराज्यात आरमार उभारण्याचा मार्ग. स्वराज्यात आरमार उभारताना कोणत्या बाबींकडे विशेष लक्ष दिले गेले. आरमार उभारताना कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागला. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्यातील आरमार धोरण काय होते याबद्दल आपण आजच्या लेखातून जाणून घेणार आहोत.

- छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गर्दर्शनाखाली स्वराज्यात 24 ऑक्टोबर 1657 मध्ये भिवंडी, कल्याण व पेण मध्ये पहिल्या जहाजाची निर्मिती केली.
- स्वराज्यात सुरु असलेल्या जहाजबांधणीच्या कामासाठी महाराजांनी पोर्तुगिज अभियंत्यांना देखील ठेवले होते. जहाज बांधण्यात पारंगत असलेले लैतांव व्हियेगस व त्याचा मुलगा फेर्नाव व्हियेगस यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी महाराजांनी पहिली 20 लढाई खलबते बांधण्यास सुरुवात केली.
- जहाज बांधणीसाठी लागणार निधी उभारण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सण १६६४ मध्ये सुरत लुटीदरम्यान मिळालेल्या धनाचा उपयोग केला. व याच धनाचा उपयोग शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामासाठी देखील केला.
- सागरी सैन्य बळकट व्हावं व शत्रूंना विशेषतः इंग्रजांना धाक बसावा यासाठी सण 1672 मध्ये मुंबईच्या जवळ खांदेरी बंदरावर शिवरायांनी किल्ल्याचं बांधकाम सुरू केलं.
- आरमार बळकट व्हावं यासाठी कुलाबा किल्ल्याचं बांधकाम इसवीसन 1678 मध्ये सुरू झालं. या किल्ल्याचं बांधकाम करताना दगडी चिरे एकमेकांवर रचून भिंती बांधल्या आहेत.जेणेकरून किल्ल्यावर समुद्री लाटांचा प्रभाव होऊ नये व बांधकाम अधिक मजबूत व्हावं.
- विजयदुर्ग किल्ल्याच्या जवळ पाण्यात प्रचंड मोठी भिंत महाराजांनी बांधली होती. या भीतीची लांबी सुमारे पाऊण किलोमीटर, तर रुंदी तीन मीटर असून, किनाऱ्यापासून खोल समुद्रात तिचं बांधकाम करण्यात आलेलं आहे. विजयदुर्गवर इंग्रजांचा हल्ला झाला, त्यावेळी इंग्रजांच्या बोटी या भिंतीवरती आदळून फुटल्या.

मराठा नौदलाची स्थापना
- छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत 1680 ते 1689 या काळात मराठा नौदलाने अनेक लढाया लढल्या. मेनक भंडारी, दर्या सारंग आणि दौलत खान हे संभाजीच्या कारकिर्दीत मराठा नौदलाचे एडमिरल होते.
- जंजिऱ्यातील सिद्दी आणि इंग्रज ईस्ट इंडिया कंपनी यांच्यातील युती तपासण्यासाठी 1678-79 मध्ये शिवाजी महाराजांनी मुंबईजवळील खांदेरी आणि कुलाबा हे नौदल किल्ले बांधण्यास सुरुवात केली.
- संभाजी महाराजांनी जंजिऱ्यावर सतत दबाव ठेवला आणि त्याच्या तोफखान्याने किल्ल्याच्या तटबंदीचे मोठे नुकसान केले. मराठा नौदलाने जंजिऱ्याला तिन्ही बाजूंनी नाकेबंदी करून किल्ल्यावरील सर्व साहित्य बंद केले.
- मुंबईजवळील इंग्रजांचा प्रभाव रोखण्यासाठी संभाजी महाराजांनी एलिफंटा बेट देखील विकत घेतले.
हेही वाचा: Shiv Jayanti 2025: NCP कडून 19 ते 27 फेब्रुवारीपर्यंत 'स्वराज्य सप्ताहा' चे आयोजन, वाचा सविस्तर कार्यक्रम
- संभाजी महाराजांना मराठा नौदलाचे आधुनिकीकरण करायचे होते. त्यामुळे त्याने अरब नौदल सेनापती जंगे खान याच्याशी मैत्री केली. मराठा नौदलाला जलद जहाज बांधणी आणि तोफखाना वापरण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी संभाजींनी त्यांना कोकणात बोलावले.
- संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत मराठा नौदलाने मुंबई, जंजिरा आणि गोवा या प्रदेशांना वगळून उत्तर कोकणातील तारापूर ते उत्तर कर्नाटकातील कारवारपर्यंतच्या किनारपट्टीवर नियंत्रण ठेवले.

आरमार उभारणीत मावळ्यांचे योगदान
- शिवाजी महाराजांनी सन 1664 मध्ये सुरत लुटली. या धनाचा उपयोग शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामासाठी केला. महाराज परंतु आग्र्यात अडकल्याने किल्ले बांधणीसाठी मिळणार निधी थांबला होता त्यावेळी हिरोजी इंदुलकरांनी यांनी स्वतःचे दागदागिने गहाण टाकून पूर्ण केलं. बळकट असा किल्ला निर्माण झाला.
- महाराजांनी आरमाराचं नियोजनही अत्यंत सुव्यवस्थितपणे केलेलं होतं. दोनशे जहाजांचा ताफा करून त्यावरती सुभा, दौलतखान, मायनाक भंडारी, वेंटगी सारंगी म्हणजेच दर्यासारंग, इब्राहिम खान असे नामांकित अधिकारी नेमले आणि समुद्रावर दरारा निर्माण केला.
- सागरात इंग्रजांच्या जहाजांना चकमा देण्यासाठी महाराजांनी छोट्या नौका उभारल्या होत्या. यामुळे इंग्रज अधिकारीही अचंबित होते. महाराजांनी उभारलेल्या जहाजांची संख्या 400 च्या ही पुढे असल्याचे सांगितले जाते.
- आरमार उभारताना महाराजणांनी बांधलेल्या बोटी इतक्या उत्कृष्ट पद्धतीच्या होत्या की इंग्रजही त्याचे कौतुक करायचे. मराठ्यांनी बांधलेल्या या बोटीचा इंग्रजांनाही धाक होता. कारण आकाराने या छोट्या असलेल्या या बोटी मोठंमोठ्या जहाजांना चकमा देऊन शत्रूवर हल्ला करण्यात फायदेशीर असायच्या.