जेएनएन, मुंबई: इंडियाज गॉट लेटेंट वादाच्या (India's Got Latent Controversy Case) संदर्भात मुंबईच्या खार पोलिसांनी युट्यूबर रणवीर अलाहबादियाला (Youtuber Ranveer Allahbadia) तिसरे समन्स बजावले आहे. त्याला त्याचे म्हणणे सादर करण्यासाठी तात्काळ पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आक्षेपार्ह वक्तव्य करून गोंधळ

'इंडियाज गॉट लेटेंट' या शोमध्ये आक्षेपार्ह वक्तव्य करून गोंधळ घातल्यानंतर रणवीर अल्लाहबादिया आणि इतरांविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्याची सायबर सेल चौकशी करत आहे. 

समय रैनालाही हजर राहण्याचे आदेश

विनोदी कलाकार समय रैना यालाही उद्या सायबर सेलसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

    काय आहे रणवीर अलाहबादिया प्रकरण

    स्टँडअप कॉमेडियन समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' शोमध्ये रणवीर अलाहाबादिया अतिथी न्यायाधीश म्हणून सहभागी झाला होता. या एपिसोडमध्ये त्याने स्पर्धकाला त्याच्या पालकांच्या लैंगिक जीवनाबद्दल वादग्रस्त प्रश्न विचारले. रणवीरच्या या प्रश्नाची क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. व्हायरल व्हिडिओवर लोकांचा राग अनावर झाला. आसाम, जयपूरसह देशभरातून या शोच्या विरोधात आणि रणवीर अलाहाबादिया विरोधात विविध प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत.

    तिसरे समन्स

    या प्रकरणाची विविध सत्रावर चौकशी होत आहे. मुंबई पोलिसही याच प्रकरणात युट्यूबर रणवीर अलाहबादियाची (Ranveer Allahbadia) चौकशी करत आहेत. त्याला आता तिसरे समन्स बजावण्यात आले आहे.

    हेही वाचा - Shiv Jayanti 2025: जहाजे फुटली, इंग्रज पळाले – जाणून घ्या मराठ्यांच्या अभेद्य आरमाराची कहाणी

    सर्वोच्च न्यायालयानं लगावली फटकार

    दरम्यान, रणवीर अलाहबादिया हा या प्रकरणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयातही गेला होता. त्याने सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करुन आपल्याला अटकेपासून संरक्षण मिळावे अशी मागणी केली होती. यावर सर्वोच्च न्यायालयानं अलाहबादियाला चांगलीच फटकार लगावली आहे. 

     तुम्ही लोकांच्या आई-वडिलांचा अपमान करत आहात

    'यांच्या (रणवीर अलाहाबादिया) डोक्यात घाण भरली आहे. अशा व्यक्तीचा खटला आम्ही का ऐकावा? लोकप्रिय असण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही टिप्पणी करा. तुम्ही लोकांच्या आई-वडिलांचा अपमान करत आहात. तुमच्या डोक्यात काहीतरी घाण आहे असे दिसते. ज्या विकृत मानसिकतेचे प्रदर्शन करण्यात आले आहेत, त्यामुळे संपूर्ण समाज निराश होईल, असं न्यायालयानं म्हटलं आहे. 

    पासपोर्ट पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आदेश

    न्यायालयाने रणवीरला आदेश दिला आहे की, तो कोर्टाच्या परवानगीशिवाय देशाबाहेर जाऊ शकत नाही. तसंच, यूट्यूबरला त्यांचा पासपोर्ट पोलीस ठाण्यात जमा करण्यास कोर्टाने सांगतले आहे.