जेएनएन, मुंबई. Nagar Parishad Result 2025: राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 288 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम 4 नोव्हेंबर रोजी जाहीर केला होता. त्यानुसार 2 डिसेंबर रोजी 263 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान झाले. उर्वरित ठिकाणी काल मतदान झाले. आज राज्यभरातील नगरपरिषद, नगरपंचायतींसाठीची मतमोजणी 21 डिसेंबरला संबंधित ठिकाणी सकाळी 10 वाजता सुरू होईल. या आधीच तीन जागेवरील निकाल समोर आले आहेत.
राज्यातील नगरपंचायती आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीच्या मतमोजणीला 10 वाजता सुरुवात होणार आहे. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. मात्र, मतमोजणीच्या आधीच अनगर, दोंडाईचा आणि भुसावळ नगरपंचायत सर्व जागा बिनविरोध झाल्या आहेत.
अनगर नगरपंचायती भाजपाचा झेंडा
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात असलेल्या अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीत मोठं राजकीय नाट्य पाहायला मिळाले. एकूण 17 सदस्य संख्या असलेल्या अनगर नगरपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकला. कारण, आता या नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी प्राजक्ता पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. प्राजक्ता पाटील या मोहोळ माजी आमदार राजन पाटील यांच्या स्नुषा आहेत.
या तीन जागांवर भाजपा उमेदवार विजयी
महाराष्ट्रात तीन ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकांचे निकाल बिनविरोध लागले आहेत. या तिन्ही ठिकाणी महिला नगराध्यक्ष निश्चित झाल्या असून तिन्ही उमेदवार भाजपच्या आहेत.
- साधना महाजन (भाजपा) – जामनेर
- नयनकुंवर रावल (भाजपा) – दोंडाईचा
- प्राजक्ता पाटील (भाजपा) – अनगर
